पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना साप चावला १५ ऑगस्ट रोजी ते मतदारसंघातील गावांमध्ये पाणी भरण्याचा आढावा घेण्यासाठी गेले अन विषारी साप चावला

पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांना साप चावला. घटना १५ ऑगस्टची आहे. शनिवारी बरे झाल्यानंतर त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली. बैंस यांना आणखी दोन ते तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हरजोत बैंस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, देवाच्या कृपेने त्यांच्या मतदारसंघातील आनंदपूर साहिबमधील पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता बर्‍याच प्रमाणात ठीक झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी ते मतदारसंघातील गावांमध्ये पाणी भरण्याचा आढावा घेण्यासाठी गेले असताना अचानक त्यांच्या पायाला विषारी साप चावला.

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आता बरा असल्याचे हरजोत बैंस यांनी लिहिले आहे. बैंस यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्यांच्या चाचण्या केल्या आहेत, आता सर्व चाचण्यांचे अहवालही नॉर्मल आले आहेत. आपल्या मतदारसंघातील रहिवाशांना संबोधित करताना बैन्स यांनी लिहिले आहे की, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहेत.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची माहिती, राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा

राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *