Breaking News

राहुल गांधी यांचा इशारा, भाजपाचे चक्रव्युह तोडू, जातीय जनगणनेचा निर्णय जाहिर करू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण केलेल्या चक्रव्युववर अदानी-अंबानीचे नियंत्रण

देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी झालेल्या हलवा पार्टीला फक्त २० अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अदानी अंबानीचे प्रतिनिधी उपस्थित होते असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत देशातील ९८ टक्के जनतेपैकी कोणीही या हलवा पार्टीला उपस्थित नव्हते असे सांगत यापैकी २ टक्के लोक हे व्यवसायित, कॉर्पोरेट कंपन्यांचे लोक आधीजण उपस्थित होते असे सांगत हलवा पार्टीचा फोटो लोकसभेत दाखविला. तसेच हे २ टक्के लोक अदानी आणि अंबानीला पैसे देतात आणि तेच ह्याच्यासाठी आर्थिक तरतूद करतात असे सांगत भाजपाने जे काही पदोपदी निर्माण केलेले चक्रव्युह आले ते चक्रव्युह तोडणार असल्याचा इशारा सत्ताधारी भाजपाला यावेळी दिला.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सभागृहात हलवा पार्टीचा फोटो दाखविताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात फोटो दाखवू नये असे सूचना राहुल गांधी यांना केली. मात्र जेव्हाही राहुल गांधी तो फोटो दाखविण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी लोकसभा सभागृहातील कॅमेरा लगेच लोकसभाध्यक्षांकडे वळविला जात होता. त्यावरून राहुल गांधी यांनी लोकसभेचे कॅमेरे पक्षपाती आहेत कारण ते सभागृहात दाखवू इच्छित असलेला फोटो प्रसारित करत नाहीत अशी टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की जो फोटो दाखवायचा आहे तो बजेटच्या निमित्ताने हलवा समारंभाचा आहे. मला फोटोमध्ये एकही आदिवासी, दलित किंवा ओबीसी अधिकारी दिसत नाही, असा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी हे ज्यावेळी हलवा समारंभाचा फोटो दाखवत होते, त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतःच्या हाताने तोंड झाकण्याचा प्रयत्न करत चेहऱ्यावर उमटलेले हसू लपविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्याचा उल्लेख करत म्हणाले की, अर्थमंत्री मॅडन तुम्ही हसत आहात, ही हसण्याची गोष्टी नव्हे असेही स्पष्ट केले.

यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून पुन्हा केंद्र सरकारवर निशाना साधत म्हणाले की, तुम्ही स्वत:ला देशभक्त म्हणता, पण जेव्हा सैनिकांना मदत करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी बजेटमध्ये एक पैसाही देऊ शकत नाही, ज्या अग्निवीर जवानाचा मृत्यू झाला त्याला पैसे दिले म्हणता पण ते पैसे त्यांच्या नावे काढलेल्या विम्याचे होते, त्याला तर अद्याप नुकसान भरपाई ही मिळाली नसल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, परीक्षेचा पेपर फुटणे हा सध्या तरुणांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पण अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात एकदाही त्याचा उल्लेख केला नाही, असे ते म्हणतात. “त्याऐवजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिक्षणासाठी दिलेला पैसा २० वर्षांतील या क्षेत्रासाठी दिलेला सर्वात कमी निधी असल्याचा आरोपही यावेळी सांगितले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मोठ्या उद्योगपतींना अनुकूल असलेल्या आणि लहान आणि मध्यम व्यवसायिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारी धोरणांसह कर दहशतवाद हेच कारण आहे की सध्या भारतात तरुणांची मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, अशी टीकाही यावेळी केली.

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या इंटर्नशिप कार्यक्रमावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, कदाचित विनोद आहे, कारण तो भारतातील ५०० मोठ्या कंपन्यांमध्ये आयोजित केला जाणार आहे. तुम्ही तरुणाचा पाय मोडलात आणि त्यावर पट्टी लावली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “चक्रव्यूह” च्या मागे असलेल्या तीन शक्ती आहेत: 1. मक्तेदारी भांडवलाची कल्पना, 2. राष्ट्राच्या संस्था आणि एजन्सी, 3. राजकीय कार्यकारिणी या तिघांनी देश उद्ध्वस्त केला आहे…माझी अपेक्षा होती की हा अर्थसंकल्प या तिघांना कमकुवत करेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. तथापि, या अर्थसंकल्पाचा आत्मा हा विद्यमान फ्रेमवर्क मजबूत करणे हा आहे असा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाने आखलेले चक्रव्युह हे २१ व्या शतकातील “चक्रव्यूह” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, [मुकेश] अंबानी आणि [गौतम] अदानी या “चक्रव्यूह” वर नियंत्रण ठेवतात असे म्हणताच लोकसभेतील भाजपाच्या खासदारांकडून एकच गदारोळ करण्यास सुरुवात केली. तसेच अंबानी आणि अदानी यांची नावे घेऊ नयेत अशी मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जे सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांची नावे घेऊ नका अशी सूचना राहुल गांधी यांना केली.

त्यावर राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला हवे असल्यास, मी NSA आणि उद्योगपतींची नावे काढून टाकेन, अशी सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांना डिवचताना म्हणाले की, जर संरक्षणमंत्र्यांनी ठरवले की त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे, तर ही एक मोठी समस्या आहे… भीती आहे, असे वक्तव्य करत ते पुढे म्हणाले की, माझे भाजपामधील मित्र का घाबरले आहेत, मंत्री घाबरले आहेत, भारतातील शेतकरी घाबरले आहेत… कामगार, तरुण [घाबरले आहेत]?
“माझ्या शेवटच्या भाषणात, मी म्हणालो की देशात भीतीचे वातावरण आहे, जे सर्व स्तरावर पसरले आहे. माझे मित्र हसत आहेत, पण ते घाबरले आहेत असा टोलाही यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

दरम्यान सत्ताधारी बाकावरून राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणण्यासाठी वारंवार सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत होते. अखेर या गोंधळावर म्हणाले की, राहुल गांधी म्हणाले की, घाबरू नका, मी माझे भाषण संपवत आहे असे सांगत सध्या देशातील परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी एकच मार्ग असून तो म्हणजे जातीय जनगणना. जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक समाजातील लोकसंख्या आणि त्यांचा असणारा हिस्सा याचे उत्तर त्यांना मिळणार आहे. पण तुम्हाला जणगणनेची भीती वाटते.

तुम्हाला आवडो किंवा न आवडो, आम्ही या सभागृहात जात जनगणना करण्याची घोषणा करायला लावू असा निर्धारही यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी जाहिर केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *