राहुल गांधी यांचा सवाल, देश राज्यघटनेने की मनुस्मृतीने चालणार…सावरकरांच्या भूमिकेशी प्रतारणा संसदेतील राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित चर्चेत राहुल गांधी यांचा सवाल

आधुनिक भारताच्या नियमांची पुस्तिका म्हणजे राज्यघटना ही असून ही राज्यघटना संत बसवेश्वर, तथागत गौतम बुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले हे एक हस्तावेज आहे. मात्र सावरकर हे हिंदूंसाठी मनुस्मृती हाच कायदा असल्याचे सांगितल्याचे एक कोट सांगत सत्तेवर बसलेले सत्ताधारी नेहमी सावकर यांचे उदोउदो करत असतात आणि तेच आज राज्यघटनेची सुरक्षा करत असल्याचे सांगतात. त्यामुळे ते त्यांचा नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या घोषणेशी प्रतारणा करत आहेत, सावरकर यांच्या विचारधारेची त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची करत आज नेमके सत्ताधाऱ्यांना राज्यघटनेच्या सुरक्षेच्या नावाखाली त्यांना त्यांना प्राचीन काळी जशी व्यवस्था होती, तशीच व्यवस्था यांना चालवायची असल्याचा आरोपही यावेळी भाजपावर केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, हजारो वर्षापूर्वी दिल्लीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जंगल होते. साधारणतः हा महाभारताचा काळ असावा, त्यावेळी एक मुलगा चार वाजता सकाळी वर्षाचा मुलगा त्या जंगलात जाऊन धनुष्याचा अभ्यास करायचा. एक दिवशी या मुलांने गुरु द्रोणाचार्यांकडे जावून धनुर्विद्या शिकविण्याची विनंती केली. मात्र गुरु द्रोणाचार्यांनी त्या मुलाला तु उच्च जातीतील नसल्याचे सांगत त्याला शिक्षण देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या मुलाने स्वतःहून धनुर्विद्याचे शिकला, एके दिवशी एक कुत्रा जंगलात भुंकत होता, त्यावेळी या मुलाने त्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारत त्याचे भूंकणे बंद केले. त्याचे हे कौशल्य पाहून द्रोणाचार्यांनी कोण आहे म्हणून बघायला आले आणि त्यावेळी ज्याला धनुर्विद्येचे शिक्षण देण्यास नकार दिला तो मुलगा एकलव्य आपणच असल्याचे असल्याचे सांगितले. त्यावेळी द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घेतल्याचा दाखला यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, यापूर्वी मी माझ्या भाषणातून अभय मुद्रेवर बोललो, त्यावेळी निर्भय बनण्यासाठी सत्याच्या बाजूने उभे असणे गरजेचे आहे. जो सत्याच्या बाजूला असतो तो निर्भय असतो, त्याला भीता नसते असेही यावेळी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले.
यावेळी तपस्या या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का असा सवाल भाजपाच्या सदस्यांनी सवाल केला. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, तपस्या म्हणजे शरीरात गर्मी निर्माण करणे असा अर्थ सांगितले. त्यावेळी भाजपाचे सदस्य जोरात हसू लागले. मात्र त्या हसण्याकडे दुर्लक्ष करत राहुल गांधी पुढे आपले भाषण तसेच पुढे सुरु झाले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ज्या पद्धतीने द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगुठा कापून घेतला, तसे तुम्हीही संपूर्ण देशाचा अंगठा कापत आहात. जेव्हा तुम्ही अदानीला धारावीची जमिन देता, जेव्हा अंबानीला तुम्ही सगळे संरक्षण दलाचे वर्कशॉप देता तुम्ही त्यांचा अंगठा कापून घेता, ज्यावेळी तुम्ही छोट्या उद्योगाला सवलती देण्याच्या नावाखाली छोटे-मोठे उद्योगात काम करणाऱ्यांचा अंगठा कापून घेता. ज्यावेळी देशातील तरूण जेव्हा परिक्षांची तयारी करतात पण तुम्ही परिक्षांचे पेपर लिक केले. अशा पद्धतीने तुम्ही देशातील तरूणांचा अंगठा कापून घेत आहात. असा आरोपही यावेळी केला.

हाथरसमधील घटनेसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी हाथरस मधील एका मुलीच्या घरी गेलो, त्यामुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणातील जे आरोपी होते ते खुलेपणाने फिरत आहेत. पण त्या मुलीचे कुटुंबिय मात्र घराचा दरवाजा बंद करून बसले आहेत. त्यांना बाहेर फिरू दिले जात नाही. जर घराबाहेर पडले तर त्यांना त्या प्रकरणातील आरोपींकडून धमकावले जाते. जर उत्तर प्रदेशात राज्यघटना कदाचीत लागू होत नाही, तेथे मनुस्मृतीचा कायदा लागू होत असवा असे अशी खोचक टीका करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरळसरळ खोटं बोलतात की त्या पीडीत मुलीच्या कुटुंबियांना आम्ही दुसरीकडे जागा देऊ घर बांधून देऊ पण ते आजपर्यंत केले नाही. जर तुम्ही केले नाही तर ते काम आम्ही करू असा निर्धार व्यक्त केला. तसेच दलितांवर अत्याचार, अन्य धर्माच्या लोकांना गोळ्या मारून ठार मारणे हे कुठे लिहिले आहे राज्यघटनेत, राज्यघटनेत जन्म, स्थळ, जात, वर्ण, धर्म, वंश या आधारे कोणताही भेद करणार नाही असे राज्यघटनेत सांगितले असतानाही हे सरळसरळ भेदाभेद करत असल्याचे दिसून येत आहे.

राहुल गांधी शेवटी बोलताना म्हणाले की, देशातील तरूणांचा अंगठा कसा कापला गेला आहे, हे आम्हाला देशाला सांगायचा आहे, त्यासाठी जातीय जनगणना आम्हाला करण्याची मागणी आमची आहे. ही जातीय जणगणना झाल्यानंतर देशातील नव्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आरक्षणातील ५० टक्क्याची अट ज्याला सत्ताधारी घाबरतात ती अट आम्ही काढून टाकणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *