अखेर ठरलं, वायनाडमधून प्रियंका गांधी वड्रा, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार काँग्रेस पक्षाचा निर्णय सोनिया गांधी यांच्याबरोबरील बैठकीनंतर निर्णय

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. या दोन्ही जागांवर राहुल गांधी विजयी झाले. त्यामुळे राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच राहुल गांधी यांनीही आपण वायनाड मतदारसंघातील लोकांच्या प्रेमात असून रायबरेलीतील लोकावरही प्रेम असल्याचे सांगत कोणत्या मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देणार याबाबत आणखीनच उत्सुकता निर्माण केली.

अखेर राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे ठेवणार याबाबत आज स्पष्ट करत केरळमधील वायनाड मतदारसंघा्च्या लोकप्रतिनिधीत्वाचा अर्थात खासदारकीचा राजीनामा देणार असून रायबरेली हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवणार आहेत.

तर राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी-वड्रा या निवडणूक लढविणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी भेट घेत वायनाडच्या जागेवरून राहुल गांधी राजीनामा देतील तर त्या रिक्त होणाऱ्या जागेवरून प्रियंका गांधी या उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची अधिकृत घोषणा मल्लिकार्जून खर्गे यांनी केली.

त्यानंतर प्रियंका गांधी-वड्रा म्हणाल्या की, वायनाडमधील लोकांना राहुल गांधी यांची उणीव जाणवू देणार नाही. आम्ही दोघे बहिण भाऊ- रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी काम करू. त्याचबरोबर त्यांनी जे प्रेम दिलंय त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून आम्ही राहु आणि लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करू. तसेच रायबरेलीशी असलेलं माझं नातं कोणी तोडू शकत नाही असेही यावेळी त्या म्हणाल्या.

 

About Editor

Check Also

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर मतदान २३ एप्रिलला तर ४ मे २०२६ रोजी मतमोजणी होणार

भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *