रामदास आठवले यांची माहिती, रिपब्लिकन पक्षाला नगरपालिका निवडणुकीत राज्यभरात घवघवीत यश वर्धा ; सोलापूर; सातारा; रायगड; यवतमाळ; कोल्हापूर आदी जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी

राज्यात नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील हुपरी नगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मंगलाराव माळगे हे बहुमताने विजयी झाले आहेत. हुपरी मध्ये शीतल कांबळे; पन्हाळा नगर परिषद मध्ये प्रतीक्षा योगेश वराळे; आजरा नगर परिषद मध्ये कलावती कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रतीक गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथे रिपब्लिकन पक्षाचे अविनाश मडीखांबे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच कुर्डुवाडी नगरपरिषदेत रिपब्लिकन पक्षाचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देवळाली नगरपरिषद राहुरी तालुका येथे रिपब्लिकन पक्षाचे सौ सुनीता सुरेंद्र थोरात; अरुण मोहन साळवे नगरसेवक पदी निवडून आले. शेवगाव नगरपरिषदेत कैलास तिजोरे ; राहुल मगरे हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे सौ.वंदना सुनील रोकडे; किरण लक्ष्मण बिनर हे दोन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे २ उमेदवार वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ विक्रांत गर्गपूर्ण भगत आणि वैशालीताई अमन काळे, प्रभाग क्रमांक ८ मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) एबी AB फॉर्म वर अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढून विजयी झाले असल्याचे सांगितले.

तसेच रामदास आठवले यांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग नगरपरिषदेत रिपब्लिकन पक्षाचे मारुती सुदाम खारवे विजयी झाले आहेत.रायगड जिल्ह्यात खोपोली सौ.उज्वला प्रमोद महाडीक;अमित काळे हे दोन उमेदवार विजयी झाले. यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेत रिपब्लिकन पक्षाच्या श्रुती सौरभ भोयर या निवडून आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात अहमदपूर प्रदीप कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यात सातारा नाशिक रायगड अहिल्यानगर यवतमाळा वर्धा लातूर या सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र सर्व राज्यभर रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *