Breaking News

रामदास कदम म्हणाले, भाजपाचे मंत्री ‘निरुपयोगी’, भाजपाचा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीस, रविंद्र चव्हाण यांचा पलटवार

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना निरुपयोगी मंत्री असल्याची टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्तुत्तर देताना म्हणाले की, महायुतीच्या तत्त्वांशी सुसंगत आहे का, असा सवाल करत गेली ४० वर्षे मंत्री आणि आमदार म्हणून कोकणचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास कदम यांनी कोणती विकासकामे केली, असा सवाल भाजपाचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निरुपयोगी मंत्री म्हणत टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामदास यांच्या टीकेला प्रत्त्यत्तर दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ४० वर्षात रामदास कदम यांनी काय केले असा सवाल केला.

ठाण्यात पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामावरून रविंद्र चव्हाण यांची खरडपट्टी काढली. रामदास कदम म्हणाले की, प्रभू रामाचा वनवास १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संपला असला तरी मुंबई-गोवा महामार्गावरील समस्या तशाच आहेत. चांगल्या रस्त्यांपासून आपण आजही वंचित आहोत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पूर्णपणे निरुपयोगी असल्याचे दिसून येत आहे. युतीत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा मागावा, असे माझे उघड मत आहे. रस्त्यांची स्थिती अजूनही सुधारलेली नसताना मंत्र्यांच्या आढावा बैठका आणि दौऱ्यांचे प्रयोजन काय, असा सवालही केला.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रामदास कदम जाहीरपणे अशी टिप्पणी करताना युतीचे कोणते तत्व पाळत होते. तो त्याच्या चिंता आमच्यासमोर मांडू शकला असता. तरीसुद्धा, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे मी लक्ष देईन असे स्पष्ट केले.

मी योग्य उत्तर देऊ शकतो: रविंद्र चव्हाण

डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, गेली ४० वर्षे आमदार आणि मंत्री म्हणून रामदास कदम कोकणचे नेतृत्व करत आहेत, या काळात त्यांनी किती विकासकामे केली असा सवाल करत, ते आधी स्पष्ट करा असे आव्हान देत मुंबई-गोवा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. कोकणचे सुपुत्र या नात्याने या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघाला विकासकामांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या बद्दल कदम पिता-पुत्रांनी आमचे कौतुक केले पाहिजे. उलट ते माझ्यावर टीका करत आहेत. रामदास कदम मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर रविंद्र चव्हाण चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.

पुढे बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, युती धर्म पाळण्याचा ठेका एकट्या रवींद्र चव्हाण यांनी घेतला नाही. युती धर्माचे पालन करणे ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे. भाजपा या नात्याने आम्ही अत्यंत संयमी आणि नम्र वृत्तीचा अवलंब करून रखडलेली विकासकामे आणि सार्वजनिक कामे रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सौजन्याचा मार्ग बाजूला ठेवून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर द्यायला तयार आहोत, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

Check Also

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांना भेटून संवाद साधणार शिवसेना जनतेच्या घरी, आठवडाभरात १ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबर २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *