विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल साहित्य संमेलनात कसा मी घडलो या मुलाखत वजा कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यावर राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर आज पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसैनिकांसह संजय राऊत यांनी एकच हल्लाबोल केला.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपावर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी दोन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा संधी दिली. वास्तविक पाहता महिला आघाडीचा विरोध असताना नीलम गोऱ्हे यांना संधी देण्यात आली. तरी सुद्धा त्यांना संधी देण्यात आली. मग त्यांना संधी देण्यात आली म्हणून त्यांनी किती मर्सिडेजच्या गाड्या दिल्या. त्यांच्याकडे चिक्कार पैसे आहेत म्हणून त्यांनी साहित्य संमेलनालाही ५० लाख दिले असतील त्यामुळेच साहित्य संमेलनात त्यांना बोलाविण्यात आल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, त्या ज्या विधान परिषद सभागृहाच्या उपसभापती आहेत, त्यांनी सांगावे की, प्रश्न लावण्यासाठी किती पैसे घेता ते, पैसे घेतल्याशिवाय प्रश्नच लावले जात नाहीत. प्रश्न लावण्यासाठी त्या पैसे घेत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. काय तुमचा हक्कभंग माझ्या विरोधात आणायचा तो आणा असे आव्हानही यावेळी नीलम गोऱ्हे यांच्यावर करत ती बाई नाही तर बाई माणूस, ती निर्लज्ज आहे, नमकहराम आहे, अशी खोचक टीकाही यावेळी केली.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे साहित्य संमेलानाचे स्वागताध्यक्ष आहेत, त्यांनी या विषयावर बोललं पाहिजे. जशी त्यांच्यावर कोणी टीका केली तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी बोलतो, तस त्यांनीही या प्रश्नावर बोलावं. त्यांनीही कसा घडलो-बिघडलो या कार्यक्रमात बोलवलं असतं तर आम्हीही सांगितले असते की कसे घडलो आणि बिघडलो ते असा उपरोधिक टोलाही यावेळी केला.
साहित्य संमेलनही खंडण्या घेऊन भरविले जात असल्यानेच त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या लोकांना साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला बोलविले जात असल्याचा आरोप करत त्या बाईनेही ५० लाख रूपये दिले असतील साहित्य संमेलनाला त्यामुळे तिला बोलावले. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्या मर्सिडीज खरेदी करू शकतात त्यामुळे त्यांनी साहित्य संमेलनाला पैसे दिले असतील अशी उपरोधिक टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
Marathi e-Batmya