संजय राऊत यांचे टीकास्त्र, राष्ट्रवादीच्या त्या दोन नेत्यांचे पाय भाजपात पक्षफुटी पूर्वी सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर सर्वाधिक गुन्हे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती, तर मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी भाजपाला नक्कीच माहिती दिली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, पक्षफुटीपूर्वी ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल होते, तेच राष्ट्रवादीचे काही नेते आज विलिनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. यामागे भाजपचा दबाव आहे का? असा सवाल उपस्थित होत असताना ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी दावा केला की, प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे “दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत. असे टिकास्त्र सोडले आहे.

शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलिनीकरणावर चर्चा करण्यापुर्वी अजित पवार गटाचे नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले पाहिजेत असे भाष्य प्रसार माध्यमात केलं होतं. मात्र त्यानंतर मात्र ते आजपर्यंत माध्यमांसमोर आलेले नाहीत, मात्र त्यानंतर सुनिल तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विलिनीकरण करायचं होते तर ते प्रथम माझ्याशी बोलले असते असे माध्यमांमध्ये सांगून टाकले. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे वक्तव्य खोडून टाकले होते. दरम्यान यावर संजय राऊत यांनी अजित पवारांचा पक्ष देवेंद्र फडणवीस चालवितात का असा सवाल केला.

अजित पवार गटातील काही नेत्यांवर गैरव्यवहार, बँका लुटणे तसेच चुकीच्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार केल्याचे खटले सुरू असून, सत्ताधारी पक्षाकडून या नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही संजय राऊत केला. याचवेळी “प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राला जे पटेल तेच करावे,असा टोला संजय राऊत यांनी लगावत सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील घडामोडींवर निशाणा साधला आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *