आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या निर्णयावरून माघार घेतली. सध्याच सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिलेले असले तरी या दोन्ही बंधूच्या एकत्र येण्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाकित व्यक्त केले. तसेच ठाकरे घराणं कोठून आले याबाबतही माहिती दिली.
वृत्त वाहिनीशी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मराठी-हिंदी भाषेच्या वादावरही आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, मराठी कानशिलात लगावणारी भाषा बनल्याने यश मिळेल का असा सवाल उपस्थित करत पुढे म्हणाले की, हिंदी ही राजभाषा आहे. त्याचा प्रोटोकॉल आहे. ठाकरे हे ही बाहेरून मगधमधून आलेले आहेत. त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्विकारले, आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ठाकरेंबाबत मी व्यक्तीगत काही बोलणार नाही. मात्र या दोघांची युती यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण राज ठाकरे यांचे राजकारण करण्याची पद्धत वेगळी असून ते एका समाजाला पकडून आहेत. उद्धव ठाकरे यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. ते आता सर्वसमावेशक झालेले आहेत. त्यात काही चूक नाही. काळानूरुप राजकारणात बदल होत असतात. हिंदीला विरोध मराठीचा आग्रह हा त्यांचा विषय नाही. या सगळ्यातून ते राजकारण करत आहेत. ते सगळ्यांना कळतय. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी ते फार काळ एकत्र राहू शकणार नाहीत असे भाकितही यावेळी केले.
Marathi e-Batmya