अजित पवार यांच्या आवाहनावर शरद पवार म्हणाले, भाषण करण्याची पध्दत वेगळच …

निवडणुकीत मतदारांची साथ मागणं उमेदवाराचा अधिकार आहे. पण, कुटुंबातील सगळे लोक एका बाजूला आणि मीच एकटा पडलोय असं सांगणं म्हणजे भावनात्मक भूमिका मांडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांनी पुतणे अजित पवार यांनी केलेल्या भाषणातील आरोपांना उत्तर देत म्हणाले की, आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे सूचक वक्तव्यही केले.

बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भावनिक आवाहनाला दिले प्रत्युत्तर.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या पार्लमेंटमध्ये भाजपाचे बहुमत आहे. भाजपाचे बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाशी जर चर्चा केली, तर ते सुद्धा धनगर किंवा अन्य जे घटक आहेत त्यांच्यासाठी प्रस्ताव आणत असतील, तर त्यावर साथ आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. एक वेगळी भूमिका कोर्टात मांडणे, जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्यासंबंधीची जबाबदारी भाजपा सरकारने घेण्याची आवश्यकता होती, पण ती न घेतल्यामुळे धनगर समाजाबाबत हा निकाल लागलेला आहे. एक प्रकारे त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे असे भूमिकाही यावेळी मांडली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला फोन येतात, दमदाटी केली जाते. या सर्व गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या, या पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत असा पलटवार करत केला.

शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये जो कालखंड गेला, त्यानुसार कितीतरी वर्ष अधिक जितेंद्र आव्हाड हे पक्षासाठी काम करतायंत. त्यांनी देश पातळीवर तरुणांचं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील काम केलेले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली असे नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं हे अन्य लोकांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही असे सांगत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना भूमिका स्पष्ट केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल, तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांसमोर मांडावी. ५५-६० वर्ष आम्ही काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथे उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कित्येक वर्षांपासून आहे. उदाहरणार्थ, विद्या प्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास ५४ वर्ष झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्यात त्या काळात आज आरोप करणारे, काय वयाचे होते याचे गणित मांडले तर त्यांच्या लक्षात येईल की, या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे आणि म्हणून कोणी उभं राहत असेल तर त्याला जरूर अधिकार आहे असे सांगत अजित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील सर्व लोकांना माहित आहे, कुणी काय केलेले आहे. जे सत्तेत आहे त्यांनी हे आम्हीच केलं ही भूमिका घेतली तर त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. समोरच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. ज्यांचा कार्यकाळ अजून ४-५ वर्ष बाकी आहे, अशा उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली हा आश्चर्यकारक निर्णय आहे असेही प्रफुल पटेल यांच्या उमेदवार बोलताना प्रश्न उपस्थित केला.

ईडी, सीबीआयच्या धाडसत्रावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात काही यंत्रणा या अतिशय महत्त्वाच्या झालेल्या आहेत. अँटीकरप्शन, ईडी, सीबीआय या अशा आणखी काही संस्था आहेत. या सर्व संस्था किती प्रभावी आहेत. राज्यकर्त्यांवर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांवर त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, याची उदाहरणे हल्ली पाहायला मिळतात आणि तीच उदाहरणे पक्षांतराच्या संबंधीची भूमिका जे लोक करत आहेत, त्याचं कारण त्यांची व्यवस्था तिथे जोडलेली आहे असे सांगत अप्रत्यक्ष भाजपावर हल्लाबोल केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *