पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मेळावा उद्या दुपारी १ वाजता बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या मेळाव्यासाठी “राष्ट्रवादी परिवाराचा, राष्ट्रवादी विचारांचा” ही टॅगलाईन वापरण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून “प्रवास २६ वर्षाचा, मेळा निष्ठावंतांचा, जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा” ही टॅगलाईन वापरत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बालेवाडी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यास अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ,ज्येष्ठ नेते दिलिप वळसे-पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर बालगंधर्व येथील मेळाव्यास शरद पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख , राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *