काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मानलेल्या भगिनी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी केली होती. त्यानुसार उशीरा का होईना रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याचा निर्णय आज जाहिर केला. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज भेट झाली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संवाद साधला.
यावेळी शरद पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरून बदली करण्यात आली असल्याबाबतचा सवाल केला, त्यावर शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने अगदी योग्य तो निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र उशीराने का होईल हा योग्य निर्णय घेतला. मात्र आता त्या पदावर दिर्घकाळ राहणार नाहीत याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असेही यावेळी सांगितले.
तर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आम्ही आमच्या पक्षातील सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. काहीजण अर्ज मागे घेण्यासाठी जात आहेत. अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. कुणी अर्ज मागे घेत नसेल तर त्याच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना आमच्या सूचना गेल्या आहेत. शेकापशी चर्चा सुरु आमची चर्चा झाली आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढतो आहोत. तर अलिबाग, पेण, पनवेल आदी ठिकाणी शेकाप जागा लढवत असल्याचे सांगत तशा सूचना दिल्या असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी मैत्रीपूर्ण लढतीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढतीच्या दिशेने जाण्याची आमची मुळीच इच्छा नाही असे सांगत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाणार असून एकत्रितच या निवडणूका लढविणार असल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचा कोणाशी संबध नाही. हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा आहे. पूर्वीचा निर्णयही त्यांचा होता. मला आनंद आहे की, त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकचं कारण की ते सतत सांगत आहेत की, भाजपाला विरोध आहे. ते भाजपा विरोधात खेळले असते तर त्याचा फायदा भाजपालाच अधिक झाला असता. त्यांचा निर्णय़ योग्य असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री उशीरा बोलताना म्हणाले की, एका जातीवरून कोणी निवडूण येऊ शकत नाही. माझं एवढं राजकिय आकलंन आहे. एवढ्या ताकदवान राजडकिय पक्षांना एकत्र यावं लागलं. राजकिय प्रक्रिया हाताळंण साधी गोष्ट नाही. मी तर राजकिय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते असं सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केलं.
Marathi e-Batmya