Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच… मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यास नकार

लोकसभा निवडणूकीनंतर येत्या ऑक्टोंबर-नोंव्हेबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही यश मिळेल अशी अटकळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महाविकास आघाडी (एमव्हीए) आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढविणार असल्याचे सांगत आमचा चेहरा हा महाराष्ट्राचा चेहरा असल्याचे सांगत मुख्यमंत्री पदासाठी कोणा एकाचा चेहरा लोकांसमोर जाहिर करून निवडणूकीला सामोरे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जागावाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल, असे यावेळी सांगितले.

शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि इतरांचा समावेश असलेला महाविकास आघाडी, या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीचा पाडाव करण्याचे उद्दिष्ट आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, आमचा फोकस एकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होईल. आमच्या हातात तीन महिने आहेत असेही यावेळी सांगितले.

तसेच शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणूका आताच झालेल्या असून आता एकही खासदार पुन्हा निवडणूकीसाठी तयार नाही. त्यामुळे सध्या इतर पक्षातील कोणी नाराज आहेत किंवा सध्याच्या सरकारच्या विरोधात भावना असलेले कोणीही पक्ष बदल करतील असे वाटत असल्याचे दिसून येत आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा भाग असलेल्या छोट्या मित्रपक्षांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जागा वाटपाला सुरुवात झाल्यानंतर छोट्या मित्र पक्षांची जबाबदारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षावर सोपविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ने ४८ पैकी ३१ जागा जिंकून चमकदार कामगिरी केली. काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा मिळवल्या, तर शिवसेनेला (यूबीटी) नऊ आणि राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या.

महायुतीने नोव्हेंबर २०१९ ते जून २०२२ पर्यंत राज्यावर राज्य केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोसळले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून महायुतीची आघाडी करून शिंदे मुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षी जुलैमध्ये, अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर सत्ताधारी सरकारमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सरकारमध्ये बदल घडवून आणण्याची नैतिक जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. जागावाटपाबाबत वाटाघाटी अजून सुरू झाल्या नाहीत पण लवकरच सुरू होतील असेही यावेळी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युती कायम राहण्याचे संकेत नुकतेच दिले. ते म्हणाले, १५ जून रोजी “महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील विजय हा शेवट नसून सुरुवात आहे.”

Check Also

नव्या तीन भारतीय संहितेची अंमलबजावणी सोमवारपासूनः कायद्यातील प्रमुख बदल कोण-कोणते बदल होणार गुन्हे नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेत

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *