Breaking News

शरद पवार यांचे सूचक व्यक्तव्य, काल बदलापूरला हेच पाह्यला मिळालं … मराठवाड्यातील नेते व्यंकटराव जाधव यांचा पक्ष प्रवेश

जनतेला आता परिवर्तन हवं आहे. लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाह्यला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही असे प्रतिपादन शरद पवार यांनी आज केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आज महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर यांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला. यावेळी माजी मंत्री आ. अनिल देशमुख, विधान परिषदेचे आ. अरुण लाड, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, खासदार सुरेश उर्फ (बाळ्यामामा) म्हात्रे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर व भूषण सिंह राजे होळकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ४ आणि काँग्रेसची केवळ १ लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या ४८ पैकी ३१ जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते असेही यावेळी सांगितले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाद दुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या. तुमचं अंत:करणापासून स्वागत, अशा शब्दांत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. अनेक वर्षे तुम्ही शैक्षणिक जीवनात काम करत आहात. सरकार आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. तुम्ही येण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्याचा पुरेपुर उपयोग परिवर्तनासाठी केला पाहिजे असंही यावेळी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *