अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. त्यांच्या चितेची राख थंड होत नाही तोच अस्थिविसर्जनापुर्वीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाबाबत मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या संदर्भात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकीत नसणाऱ्यांना सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे नाव न घेता म्हणाले की, जे लोक बैठकीत नव्हते त्यांना या बद्दल काय माहित असणार असा खोचर सवाल उपस्थित केला.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फक्त शपथच नाही तर सुनेत्रा पवार आज प्रथम पहिल्या शासकीय दौऱ्यानिमित्त साताऱ्यात आहेत.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कोणतीही कल्पना जेष्ठ नेते शरद पवार यांना दिली नाही, असे स्वत: शरद पवार यांनी म्हटले होते. यावरही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार, तसेच अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार श्रीनिवास पवार देखील उपस्थित नव्हते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चेला खंड पडला. १२ फेब्रवारी २०२६ रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल घोषणा केली जाणार होती. मात्र, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलताना स्पष्ट सांगितले की, अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे दावे केले जात असताना शरद पवार यांनी अनौपचारीक गप्पा मारताना शरद पवार यांच्या कडून पुन्हा याबाबतचे मोठे विधान करण्यात आले. त्यांनी म्हटले की, विलिनीकरणाच्या बैठकीत सहभागी नसणाऱ्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार असा उपरोधिक टोलाही अनौपचारिक चर्चेदरम्यान लगावला.
शरद पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करत असताना म्हटले की, या विलिनिकरणाच्या चर्चेत जे कोणी सहभागी नव्हते, त्यांना या संदर्भात कशी काय माहिती असणार. शरद पवार यांनी अगोदरच स्पष्ट केले होते की, या विलिनीकरणाच्या मुद्द्यात स्वत: अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार हे सहभागी होते. असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार होते. असा दावा केला जात होता, मात्र, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून हा दावा खोडून काढला जात आहे. त्यामध्येच शरद पवार यांनी अनौपचारिक बोलताना म्हटले की, जे लोक या बैठकीत नव्हते, त्यांना याबद्दल कशी माहिती असणार. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र आता विलिनीकरणाची चर्चा लांबनीवर पडली आहे.
Marathi e-Batmya