शरद पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, पण ते आमच्या विचारांचे नाहीत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास सुरु

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केला. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती अमान्य करत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी राज्यपाल असलेल्या सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात अटक करण्याचे आदेश दिल्याचा दाखला देत सत्तेचा दुरूपयोग करणारे एनडीएचे उमेदवार अशी खोचक टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार आपल्या महाराष्ट्र राज्याचे मतदार म्हणून त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मतदान करून सहकार्य करा अशी विनंती करणारा फोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे सांगत त्यास स्पष्टपणे नकार देत असल्याचे जाहिर करत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचा दाखलाही दिला. सोरेन हे त्यावेळेचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटायला गेले असता तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. त्यावेळी, हे राजभवन आहे मला बाहेर अटक करा असे सोरेन सांगत होते. पण त्यांना राजभवनातच अटक केली असे हे उमेदवार, ज्यांच्या राज्यभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते, हा सत्तेचाही दुरुपयोग असल्याचे सांगत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्यावर टीका केली.

यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होतं आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या.आम्ही सुदर्शनजी यांचा फॉर्मही भरला आहे. सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही सगळ्यानी मिळून दोन – तीन नावाची चर्चा केली. त्यानुसार सर्वांचं एकमत झालं. मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. एनडीएचे उमेदवार राज्यपाल हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही केली होती. मात्र, मी शक्य नाही म्हटलं, कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती फेटाळल्याचे सांगत केंद्रातील सत्ताधारी एनडीएची संख्या जरी जास्त आहे तरी आम्ही काय ते बघू, पण मुख्यमंत्र्याच्या विनंतीवर मी मला शक्य नसल्याचे कळविले. खासदार संजय राऊतांशी बोलणं झालं, त्यांचीही चर्चा झाली. त्यावेळी, त्यांनीही कळवलं की त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचं बघतो, त्यांनी काय करायचं ते ते ठरवतील. निकाल वेगळा लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

राहुल गांधी यांच्या बिहार यात्रेचं कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी आपण पाहिलं ३०० खासदार रस्त्यावर उतरले, आम्हाला अटक केली. पण आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे, बिहार आर्थिकदृष्या अडचणीचं राज्य आहे, त्याचे काही प्रश्न असतील. मात्र, राजकिय दृष्ट्या ते राज्य जागरूक आहे. आणीबाणीच्या काळात पहिला संघर्ष बिहारमध्ये झाल्याची आठवणही यावेळी केली.

निवडणूक आयोगाच्या भूमिके विषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही, निवडणूक नाही आयोग स्वतंत्र आहे. मात्र, त्यांची भूमिका योग्य नाही असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला. तसेच निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाही, राहुल गांधींनी हे सर्व सत्य समोर आणलं, मात्र याची सुरूवात बिहारमधून झाल्याचे सांगितले.

शरद पवार पुढे म्हणाले की, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा नवा राजकीय रंग आता गडद होऊ लागला आहे. जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या या शून्य भरून काढण्यासाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पवारांनी पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मतांची संख्या कमी असली तरी चिंता करण्यासारखे काही नाही.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *