शशिकांत शिंदे यांची खंत, चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, चर्चा करण्यात अर्थ नाही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे मत

विलीनीकरणाच्या चर्चेवर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही भावना व्यक्त केली. अनेकांनी भावना व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलीकरणाचं सूत्र कसं असेल याबाबत चर्चेत ठरवलं जाणार होतं. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे आम्ही जर-तर वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचं नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडली.

शशिकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अजित ‘दादा पवार असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रि‍करणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्याकडून यासाठी गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेला नाही. आम्ही एवढंच म्हणालो की, दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध दिसून येतोय का? याबाबतच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगणं योग्य ठरणार नाही असेही स्पष्टपणे सांगितले.

शेवटी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने काम करण्याची भूमिका घेतोय. त्यामुळे विलीनीकरणावर मी बोलणार नाही. अजितदादांची चूक झाली आहे असं मी म्हटलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अजित दादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाबाबत दुरुस्ती करायची होती. अजितदादा भावनिक होते. शरद पवार साहेबांच्या भेटीतही अजितदादांनी कधीच नजरानजर केली नाही, याबाबत काय निर्णय घ्यायचा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होतं. त्यांच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं हे आता गेल्यानंतर सांगणं योग्य नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी मार्गदर्शन करणार ! सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान शिबिर; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *