… दिल्लीचेही तख्त शिवसेना हलवणार

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांचा इशारा 

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये युती करण्यावरून राजकीय कलगीतुरा सुरु आहे. मात्र युतीचा प्रस्ताव नसला तरी दिल्लीचे तख्त शिवसेना हलविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी देत भाजपला एकप्रकारे आव्हान दिले.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर युती करायची की नाही यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक सोमवारी सकाळी बोलावली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे. कोणत्याही स्तिथीत सेनाच मोठा भाऊ असणार आहे. भाजपकडून अद्याप युती बाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. ज्या काही चर्चा सुरु आहेत त्या केवळ अफवा असल्याचे सांगत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी समर्थ असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

सेनेत  दिल्लीचे तख्त  हलवण्याची ताकद असून ही बैठक युतीच्या मुद्यावर नव्हतीच महाराष्ट्रातील दुष्काळ आणि इतर विषयवांवर यावेळी चर्चा झाली. तसेच आगामी आगामी लेखानुदान अर्थसंकल्पिय अधिवेशनासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

एकीकडे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यातली दरी कमी होत असल्याचे चित्र दिसत असताना, शिवसेनेकडून पुन्हा भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेलच्या मुद्यावर घेरले आहे. याचीच री ओढण्याचे काम आता शिवसेना करत आहे. राफेल बाबत आणखी काही नवीन मुद्दे समोर आपले असल्याचे सांगत शिवसेनेने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राफेल घोटाळ्याबाबत काही नवीन माहिती समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *