राज ठाकरेंच्या त्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, मॅच्युअर झालात थोडं पुढे पहा…

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा गोरेगांव येथील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच या तिघांच्या बोलण्याची नक्कलही करून दाखविली. त्यावरून शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत हे सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. अनेकजण आहेत आम्ही खरी मिमिक्री बघू. आवाज काढणं अजून काहीतरी करणं, हे आता खूप झालं. आपण आता mature झालेला आहात. थोडं पलिकडे पाहा, महाराष्ट्र पाहा पूर्ण असा खोचक सल्ला दिला.

उद्धव ठाकरेंवर टीका करून अन्य कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? कोणाचंही मी एका पक्षाचं नाव घेत नाही. राजकारणात काही विधायक काम करा. संघटनात्मक काम करा, जे आम्ही करतोय. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत, तरी आमचा पक्ष उभा राहतोय, लढतोय काम करतोय. ज्यांनी आमच्यावर टीका केली, करत आहेत असा इशारा देत त्यांनी बुलढाणा येथे झालेला आमची सभा पाहायला हवी होती आणि त्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं भाषणही ऐकायला हवं होतं असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी पक्षप्रमुख यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी भाजपाशी युती तोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. स्वार्थ आणि पैशांसाठी आपण कधी विचारांशी प्रतारणा केली नाही, असेही ते म्हणाले.

याशिवाय, “काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही असा खोचक टोला राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना काल लगावला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *