शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा सादर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकातून सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने चांगला आराखडा तयार करून सादर करावा असा आदेश नगरविकास विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी या बैठकीस उपस्थित होते.

राज्य सरकारकडून दादर येथील महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *