राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवारांनी दिली नवी ताऱीख, वाचा कोण होणार मंत्री १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्र्यांचा शपथविधी

राज्यात सत्तांतर झाल्यापासून बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने नेहमी तारखा जाहीर करण्यात येतात. त्यानुसार आजही केरसकर यांनी शनिवारी किंवा रविवारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहिर केले. मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख दिली असून १५ ऑगस्टच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले.

राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारची वैधता, शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व प्रकरणांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मंत्र्यांचा शपथविधी नेमका कधी होणार याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र साधारणत: १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे हे झेंडावंदन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होईल, याबाबत मनात शंका नाही.

याआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी केला जाणार असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले होते. यावेळी ज्येष्ठ आमदारांचा शपथविधी होईल. यामध्ये भाजपाचे सात आणि शिंदे गटातील सात आमदारांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार येत्या १५ ऑगस्टच्या अगोदर होणार,

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षावर गुरुवारी (४ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीतही कोर्टाने याबाबत स्पष्ट निर्णय दिला नाही. मात्र पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचे का? याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळणाऱ्यांमध्ये ही संभावित नावांची यादी
भाजपा
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरिष महाजन, साधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण.
शिंदे गट
दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *