जेव्हा अध्यक्ष महाराज आमदारांची शाळा घेतात… भाजपच्या मुख्य प्रतोदांना अध्यक्ष बागडेंची ताकीद

मुंबई : बी.निलेश

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भाजपचे आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आपली जागा बदलण्यास मज्जाव घातला आणि काही मीनिटांसाठी आपण शाळेत आहोत की असा भास सर्वच आमदारांना झाला…

घटना अशी घडली की… राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोध पक्षांनी मांडलेल्या मराठी शाळांबाबतच्या २९३ अन्वये प्रस्तावावर बोलत होते मात्र त्याच वेळी आमदार राज पुरोहित आपल्या नेहमीच्या जागेवरून उठून इतर सदस्यांशी वार्तालाप करण्यासाठी जात होते तेव्हा ‘राज पुरोहितजी आपण जागेवर बसा… कैबिनेट मंत्री झाल्यापासून तुमच्या हालचालीत वाढ झाली आहे…’ अशी तंबी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी राज पुरोहित यांनी दिली. त्यानंतर एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्याप्रमाणे राज पुरोहितही आपण काहीही चुक केली नसल्याचे स्पष्टीकरण अध्यक्षांना देऊ लागले आणि विधानसभेत काही काळासाठी शाळेचे वातावरण तयार झाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *