उध्दव ठाकरे यांना सांगितले, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही संजय राऊत यांच्या भेटीवरून पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली भूमिका

नुकतेच शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रहायचे तर मनाने नाही तर नाही असे सांगत मी त्यावेळीच सांगितले माझा दरवाजा उघडा आहे. जायचं तर खुशाल जा आणि रहायचे असेल तर रहा. माझ्यासोबत असलेल्या निष्ठावंतांचा अभिमान असल्याचे ही स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी त्यांचे निष्ठावंत आणि विश्वासू असलेले संजय राऊत यांच्या भेटीसाठी आज पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली. मात्र पोलिसांनी उध्दव ठाकरे यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय संजय राऊत यांना भेटता येणार नसल्याचे सांगत राऊत यांच्या भेटीसाठीची परवानगी नाकारली.

जवळपास एक महिन्यापासून संजय राऊत हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर पत्रावाल चाळ प्रकरणी आणि अन्य एका मालमत्ता खरेदी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने राऊत यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत.

उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने, त्यांना भेटायचं असेल, तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे सांगितले. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशाच पद्धतीने उद्धव यांना संजय राऊतांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने, यासंदर्भात उद्धव यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिलं नव्हतं. उद्धव यांच्या तर्फे एका व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचं आहे असं सांगण्यात आलं. मात्र तुरुंग अधीक्षकांनी राऊत यांना भेटायचं असेल तर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेटावे लागेल आणि ही भेट घेण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगण्यात आलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने फोनवरुन अनौपचारिक भेटीसंदर्भात विचारपूस केली होती. तुरुंग अधीक्षकांच्या रुममध्ये राऊत यांना भेटण्याची परवानगी द्यावी यासंदर्भात विचारणा झाली. मात्र, अशाप्रकारे भेट देता येणार नाही. रितसर पद्धतीने परवानगी घेऊनच भेट घेता येईल असं सांगण्यात आलं.

तुरुंगातील मॅन्यूअलप्रमाणे केवळ रक्ताचं नातं असणाऱ्या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येतं. इतर कोणाला कैद्याला भेटायचं असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *