सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, आमचे नेते फडणवीस आणि अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेतील धनंजय मुंडे यांच्या विनंतीचे अर्थ वेगवेगळे निघतात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यास अटक करण्यात आली. तसेच या अटकेनंतर देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडीत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाषणा दरम्यान विनंती करत मला रिकामं ठेवू नका कोणती तरी जबाबदारी द्या अशी विनंती केली. त्यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आमचे नेते मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रित बसून योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, ते मला म्हणाले की काम द्या, याचे वेगवेगळे अर्थ आहेत. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. वेगवेगळे अर्थ घेता येतील त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेता येतील कारण त्यांनी राजीनामा दिला त्याची काही कारणं आहेत. न्यायलयीन प्रक्रिया आणि चौकशी सुरु आहे. त्यासंदर्भात आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगितले.

धनंजय मुंडे म्हणाले की, माझी सुनिल तटकरे यांना विनंती आहे की, त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत रहावं आम्ही चुकलो तर कान धरावं चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो असेही यावेळी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावत म्हणाले की, मुंडे यांच्या मागणीचा पक्ष जरूर विचार करेल, तोवर मी एवढंच सांगेन की, आपल्याकडे एक काम आहे. बाकिच्या जबाबदाऱ्या अजित पवार पाहतील. परंतु आपल्याकडे ओबीसी आरक्षणाचं काम आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे या ओबीसी आरक्षणाचं काम करत होते. त्यापैकी बरच काम बाकी आहे. धनंजय मुंडे हे या ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सहभागी झाले तर बरं होईल. यामुळे गोपीनाथ मुंडे याचं स्वप्न देखील पूर्ण होईल असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *