सुप्रिया सुळे यांची स्पष्टोक्ती, सुरेश धस- धनंजय मुंडे यांच्या भेटीचा धक्का १८ तारखेला बीडला जाणार, डिपीडीसीची चौकशी लावली

भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या, पण राज्य सरकारनं ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला. सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत, असा माझा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, डिपीडीसीमधील घोळाबद्दल मी संसदेत बोलले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शब्द दिला की याबद्दल ते चौकशी लावणार आहेत. मी पाठपुरावा करणार आहे. कोणत्याही सरकारने कोणावरही दबाव टाकून परिस्थिती लपवू नये, मी स्वतः १८ तारखेला बीडला जाणार आहे. देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

तर लव्ह जिहाद प्रकरणी भूमिका विषद करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणी कोणाशी लग्न आणि प्रेम करावं, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे, असे कायदे करण्यापेक्षा त्याकडं लक्ष द्यावे असा उपरोधिक टोलाही यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. एकदा महापालिका निवडणुकीची नक्की तारीख ठरली की, त्यावर निर्णय होईल. भाजपा एकटं लढणार असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. शत प्रतिशत अशी टॅगलाईन अमित शाह यांनी यापूर्वी दिली आहे. लोकशाहीत नाराज असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. काय चुकलं काय नाही? हे लक्षात घ्यायला हवं असेही यावेळी सांगितले.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. एवढं बहुमत मिळाल आहे. पण वाचाळवीरांची संख्या अधिक आहे. यशवंतराव चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावले जातात, पण त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याची टीकाही यावेळी अजित पवार गटावर केली.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी सहकार मंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी स्वत: बोलणार आहे. या प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती करणार आहे. मागे देखील पीएनबी बँकेत घोटाळा झाला होता. सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. यावर योग्य तो मार्ग निघावा यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

छगन भुजबळ यांची मागणी, राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून आर्थिक पाठबळ आवश्यक निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे

पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *