एकेकाळच्या शिवसेना पक्षाच्या महिला उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या आरोपावरून नीलम गोऱ्हे यांच्यावर आज सकाळपासून टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. त्यातच सुषमा आंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.
नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे ह्या आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. मात्र त्या ज्या पक्षात गेल्या त्या पक्षाच्या वाढीसाठी कधीही काम केले नाही. इतकेच नाही तर पुण्यात ते ज्या भागात राहतात त्या भागात शिवसेनेची शाखाही साधी उघडली नाही. त्या ज्या पक्षात जातात त्या पक्षात चांगली लोकं येऊ नये, दुसऱ्या महिलेला मोठं होऊ द्यायचं नाही अशा गोष्टी त्या करत आल्या आहेत.
पुढे बोलताना सुषमा आंधारे म्हणाल्या की, मला जेव्हा शिवसेना पक्षात प्रवेश करायचा होता, त्यासाठी त्यांना २०१७ साली माझी आणि त्यांची भेट झाली होती. त्यानंतर पक्षात प्रत्यक्ष प्रवेश मिळायला मला पाच ते सात वर्षे लागली. पण शिवसेनेतील प्रवेश हा काही त्यांच्या माध्यमातून नव्हे तर सचिन अहिर यांच्या माध्यमातून प्रवेश मिळाला असे सांगत शिवसेनेत चांगल्या महिलांना येऊ द्यायचे नाही, जर आल्या तर त्यांचे पाय कसे कापायचे किंवा संबधित महिलेबद्दल आधीच चुकीची माहिती द्यायची अशी काम करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
सुषमा आंधारे बोलताना पुढे म्हणाल्या की, आम्ही नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अब्रु नुकसानाचा दावा दाखल करणार आहोत. त्याविषयीची कागदपत्रे आमच्या लीगल टीमकडून तयार करण्यात येत आहेत. वास्तविक पाहता नीलम गोऱ्हे यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, पण त्या शिवसेनेचं देणं लागतात. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप एकतर सिद्ध करावेत अन्यथा नाक घासून माफी मागावी असा इशाराही यावेळी दिला.
शेवटी बोलताना सुषमा आंधारे म्हणाल्या की, आमच्या लीगल टीम कडून रात्रीपर्यंत अंतिम मसुदा येईल आणि त्यानंतर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya