राहुल गांधींच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन… सभात्याग केल्यानंतर विरोधक दिवसभर कामकाजात सहभागी झाले नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई आणि विधानसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही त्यावर चकार शब्द बोलू दिले नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *