अंबादास दानवेंची मागणी, मार्फ व्हिडिओ प्रकरणी, प्रकाश सुर्वेंच्या मुलाचे फेसबुक अकाउंट तपासा विधान परिषदेत मागणी करत सत्ताधारी पक्षावर साधला निशाणा

शिंदे गटाच्या शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी महिला आमदारांनी विधिमंडळात जोरदार विषय लावून धरत याप्रकरणी एसआयटीची मागणी केली. या मागणीला विरोधकांनीही पाठिंबा दिल्यानंतर राज्य सरकारकडून एसआयटी पथक स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ आमदार पुत्र सुर्वे यांच्या मुलानेच लाईव्ह केल्या स्ट्रिमिंग केल्याची माहिती ठाकरे गटाने पुढे आणली. या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचे फेसबुक अकाउंटही तपासण्यात यावे, अशी मागणी केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना अंबादास दानवे व्हायरल व्हिडीओसंदर्भात म्हणाले, एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ मीच १० लोकांना पाठवला आहे. यूट्यूबवर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ३२ देशांतील लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आणि पोलिस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. हा व्हिडीओ ओरिजनल आहे की मॉर्फ आहे, याची चौकशी पोलिस करतच नाहीत. ते फक्त कारवाई करत सुटले आहेत, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधाऱ्याना लगावला.

आमदाराचा व्हिडीओ बनावट असेल तर जरूर कारवाई करा. पण, तो खरा असेल तर खासगी संबंध ज्याच्या त्याच्या घरी… सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

यावेळी अंबादास दानवे यांनी सदा सरवणकर यांच्या रिव्हॉल्व्हरचा मुद्दाही उपस्थित केला. यासंदर्भात पोलिस आयुक्तांना भेटलो तेव्हा ते म्हणाले की, ‘मी बिलकुल एकतर्फी कारवाई करणार नाही.’ पण एका आमदाराच्या बंदुकीतून गोळी झाडली जाते. त्यानंतर पोलिस म्हणतात की, ‘गोळी झाडली तेव्हा बंदूक आमदाराच्या हातात नसावी’. मग आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याच्या हातात देणे हा गुन्हा ठरत नाही का? पण गृह मंत्रालय आणि सरकार गुन्हे करणाऱ्यांच्या बाजूने आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती राज्यात असल्याची टीकाही केली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *