रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत काही मागण्या केल्या.

त्या मागण्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यातील दोन मागण्यांना आपण लगेच प्राथमिकता देत अमित शाह यांच्याकडे त्या मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरत आहोत असेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, आज आपण अत्यंत थोर व्यक्तीपुढं नतमस्तक होण्यासाठी आपण उपस्थित राहिलो आहोत. शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा हा विचार दिला. स्वराज्याची स्थापनाही केली. आज लोकशाही आहे, त्या काळात हा विचार स्वराज्याच्या रूपाने शिवरायांनी दिला. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला असे सांगत यावेळी आपण काही मागण्या करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या खालील प्रमाणे

१) छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षाची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा, कुठलाही जामिन त्याला मिळू देऊ नये,

२) शिवाजी महाराजांच समग्र प्रकाशन सरकारने करावं

३) सेन्सॉर बोर्डही स्थापन करण्यात यावं, एखादा माणूस कादंबरी लिहिलो, पण त्याला काही पुरावे नसतात, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत गैरसमज होतात ते अशा गोष्टींमुळे त्यामुळे सेन्सॉर बोर्ड स्थापन केलं पाहिजे.

४) छत्रपती शिवाजी महाराज याचं स्मारक दिल्लीत झालं पाहिजे हि देखील शिवभक्ताची मागणी आहे.

५) शहाजी राजे यांची जी समाधी आहे, त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.

६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी माझी मागणी आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी या ६ मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच जाहिर केलं की, उदयनराजे यांनी केलेल्या मागण्यांपैकी २ मागण्या प्रामुख्याने आपण हातात घेणार असून त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आग्रह धरू असे सांगत दिल्लीत शिवाजी महाराजांच स्मारक व्हाव अशी मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करत आहोत, तसेच महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खर तरं टकमक टोकावरून ढकलंल पाहिजे अशी आमची भावना आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणी प्रमाणे कठोर कायदा करू असे आश्वासनही यावेळी दिले.

About Editor

Check Also

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुवार पासून कार्यशाळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह ज्येष्ठ नेते व तज्ञ मार्गदर्शन करणार.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *