उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल,.. भाजपा संपलेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

मराठी माणसांसोबत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करत तुम्ही चांगले केल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. परंतु भाजपाच्या बुडाला आग लागणे साहजिक आहे. भाजपाचे राजकारण तर तोडा, फोडा आणि राज्य करा असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या हाच धंदा भाजपाचा झाला आहे. आणि तो आता संपलेला आहे अशा शब्दात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील ठाकरेंनी महाराष्ट्र सोडून येवून दाखवावे म्हणजे त्यांना उचलून उचलून आपटू अशी धमकी वजा इशारा भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आज एका वृत्त संस्थेशी बोलताना केले. तर आशिष शेलार, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही टीका केली. त्यास उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना खरपूस समाचार घेतला. तसेच वृत्तवाहिन्यांशी बोलताना बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाहेरची लोक इथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांचे घर पहावे. त्यांचा जो पक्ष मेलेला आहे. तो पक्ष जिवंत होतो का ते आधी बघावे, मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो पण याची तुलना भाजपाले पहलगाम हल्ल्याशी करत आहेत. हेच मराठीचे मारेकरी आणि महाराष्ट्राचे मारेकरी असल्याचा हल्लाबोल करत पुढे बोलताना म्हणाले की, ही माणसे अगदी खालच्या पातळीवर गेलेली आहेत. आम्ही आमचे पाहून घेऊ, पहलगामचे अतिरेकी भाजपात गेले आहेत का, मिळत कसे नाहीत असा सवाल करत ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांच्या घऱात रहात आहेत का  असा सवाल करत लाज वाटली पाहिजे हिंदूंना वाचवू शकत नाहीत आणि मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेता, हे कसले कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात दुर्दैवीने राज्यकर्त्ये आहेत याची लाज वाटते असा निशाणाही भाजपावर साधला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा आहे. त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल ते ते आम्ही करू. इथे आम्ही आनंदात रहात आहोत. पण काही लोक आमच्यात फूट पाडायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही काहीही बोला, इथे तुम्हाला कोणी ओळखत नाही. इथे त्यांनी येऊन पहावे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. भाषेच्या सक्तीला विरोध असून तुम्ही उगाच भाषेचा वाद निर्माण करू नका असा सज्जड दमही यावेळी दिला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मूळ भाजपा मेलेला आहे. या लोकांनी पक्ष मारून टाकला आहे. मूळ भाजपाशी शिवसेनेची युती होती. या लोकांना ऊर बडवायलाही बाहेरचे लोक घेतले आहेत. रूदाली हा ही हिंदी शब्द आहे. त्यामुळे फडणवीस यांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, मराठी माणसाचे आनंदाचे क्षणही यांना रूदाली वाटत असतील तर हि विकृत आणि हिणकस असल्याचा पलटवारही यावेळी फडणवीस आणि भाजपावर केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *