राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, त्याच गंगेत कोविड काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांचे मृत्यदेह ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला, तेथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी नदीत सोडले. तसेच तेथेच कुंभमेळ्याचे आयोजनही केले होते. त्यामुळे भाजपा प्रशासन कळत नाही आणि सरकारही चालवता येत नसल्याची टीकाही केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी नुकताच मराठवाड्याच्या भेटी साठी गेलो होते. त्यावेळी तेथील शेतात मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाणी साठल्याचे दिसून आले. तसेच लोकांच्या घरात आजही मोठ्या प्रमाणावर पाणी तसेच राहिले आहे. अशा परिस्थितीत तेथील शेतकऱ्यांना तातडीने मोठ्या प्रमाणावर मदत जाहिर करण्याची गरज आहे. या संकटात नुकतीच शेत पिक वाहून गेली नाहीतर शेतजमिनही खरवडून गेली आहे. आज जर ती वाहून गेलेली जमिन पुन्हा शेती करण्यायोग्य करायची असेल तर त्या जमिनीवर ४ ते पाच लाख रूपयांचा खर्च येणार असल्याचे सांगत तसेच पुन्हा शेत जमिनीचा पोत पुन्हा येण्यासाठी आणखी ५ ते ६ वर्षे थांबावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज असताना हा पुन्हा त्याला नव्याने कर्ज काढण्याची वेळ येणार आहे. आता हिच योग्य वेळ आहे, शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जमुक्त करण्याची आणि त्याला पुन्हा नव्याने उभं करण्याची अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भेटीनंतर गाडीत बसत होतो, त्यावेळी एका महिलेने मला सांगितले की, गरिबाच्या घरी कोणी येत नाही, तुम्ही तरी घरी येऊन आमच्या घरी बघा. त्यानंतर मी त्या महिलेच्या घरी गेलो तेव्हा त्या महिलेच्या घराच्या चार भिंती आणि फक्त डोक्यावर पत्रे होते, त्या घरातील सगळं काही वाहून गेलं होतं. मी गेल्यानंतर त्या घरातील बाकीच्या महिलांनी मला ओवळणी करण्याची तयारी केली. पण मी त्यांना नको म्हणालो. पण त्या घराची परिस्थिती पाहून माझं मनं हेलावून गेलं. मगं मला सरकारला म्हणायचं आहे की, जी पंतप्रधान आवास योजना शहरामध्ये तुम्ही राबवता, ती योजना तुम्ही अशा ठिकाणी का राबवत नाही, जिथे कच्ची-मातीची घरं आहेत, तेथे तुमच्या योजनेची खरी गरज आहे. उगाच आपलं शहरी भागात घरे बांधून आव आणता अशी खोचक टीकाही केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पंजाबमधील सरकारने आणि हिमाचल मधील सरकारने एकरी ५० हजाराची मदत देऊ केली. तसेच त्यासाठी केंद्राने त्यांना १२०० कोटी आणि १५०० कोटी रूपये दिले. मग असे असताना केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला अद्यापही कोणती मदत जाहिर केली नाही. परवा मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेले होते. तर पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. आता तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तर त्यांनी कोविड काळात तयार केलेल्या पीएम केअर फंडातून ५० हजार कोटी रूपयांचा निधी महाराष्ट्राला द्यावा अशी मागणीही यावेळी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री फंडावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चला मी तुम्ही केलेल्या आरोपानुसार मुख्यंमंत्री फंड आणि पीएम केअर फंडाच्या निधीवर बोलायला मी तयार असून यावर चर्चा करण्याची तयार असल्याचे आव्हानही असल्याचे सांगत फडणवीस यांना खुले आव्हान दिले.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविड काळात सगळं बंद असताना आणि लसीची केंद्र अवघी दोन असताना ती ६०० पर्यंत निर्माण केली. रूग्णालयांसाठी ऑक्सीजन प्लांट केले, कोविड शिबीरे सुरु केली, आणि इतकं करून ही १० रूपयात शिवभोजन थाळीही सुरु करून दाखवत शेतकऱ्यांना कर्जमाफीही जाहीर करून दाखविली. पण आताच्या सरकारने त्यांच्या काळातील २०१७ च्या मधील कर्जमाफीची आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे साधारणतः १४ हजार कोटी अद्यापही दिली नसल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात तसे मी या प्रश्नी राजकारण करणार नाही. परंतु त्यांनी विधिमंडळाचे विशेष सत्र बोलवावे आणि त्यात सर्वांनी मिळून चर्चा करू आणि मदत निधीसाठी सर्वजण मिळून केंद्राकडे जाऊ अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya