Breaking News

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल

राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या आहेत, नव्याने बांधलेले राम मंदिर हे ही लिकेज आहे. या सरकारच्या काळात सगळं लिकेजच असल्याची खरमरीत टोलाही यावेळी लगावला.

राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशानिमित्त विरोधकांची बाजू मांडण्यासाठी शिवसेना उबाठा गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांच्यासह अन्य शिवसेना आमदार उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना आणि मदत केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येतो. तसेच एक रूपयात पिक विमा सारख्या घोषणा केल्या जातात. मात्र या सरकारच्या काळात एक रूपयाच्या पिक विम्याची नुकसान भरपाई किती मिळाली तर कुणाच्या खात्यात ७० रूपये तर कुणाच्या बँक खात्यात ५० रूपये अशी नुकसान भरपाई जमा केल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आमच्या काळात शेतकऱ्यांना जाहिर केलेली नुकसान भरपाईची १० हजार कोटी रूपयांची रक्कम अद्याप राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही. आम्ही जाहिर केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेसाठी राज्य सरकारकडे निधी नाही अशी खोचक टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच त्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केली. मात्र या सरकारच्या काळात फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणाच्या गाजराची शेती केली जात आहे. एकदा राज्य सरकारने केलेल्या घोषणा आणि त्याच्या किती अंमलबाजवणी झाली याची एक श्वेतपत्रिकाच जाहिर करायला पाहिजे म्हणजे यांच्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली याची खरी माहिती बाहेर येईल असा टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार अशी घोषण केली होती. मात्र आजच्या स्थितीला दररोज सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करत असल्याची माहिती देत शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणांची फक्त आकडेवारी कागदावरच आहे. मात्र जमिनीवर त्यात मोठी तफावत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्याची तयारी सरकारकडून सुरु केली आहे. तसेच लाडली बहना नावाची नवी योजना राज्यात सुरु करण्याचा आखली जात आहे. मात्र फक्त लाडली बहनाच्या धर्तीवर लाडला भाऊ सारख्या योजनाही राज्य सरकारने आणावी अशी मागणी करत मुलगा-मुलगी असा भेद करू नका असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या राज्यात १७ हजार ५०० रिक्त जागांसाठी पोलिस भरती सुरु आहे. मात्र या १७ हजार ५०० पोलिस पदासाठी जवळपास १७ लाख अर्ज आल्याची माहिती देत या पोलिस भरतीसाठी आलेल्या तरूणांच्या निवाऱ्याची कोणतीही सोय करण्यात आलेल्या नाहीत. याचा अर्थ राज्यातील बेरोजगारी किती वाढली याचे हे एक मोठे उदाहरण आहे. त्यामुळे राज्यातल्या डबल इंजिनच्या सरकारने केंद्रातल्या एनडीए सरकारीच मदत घेऊन ही बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने आणि पोलिस भरतीतील उमेदवारांना सोयी पुरविण्याचे काम हाती घ्यावे असे आवाहनही यावेळी केले.

तसेच उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, घोषणा जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही खुशाल कराव परंतु घोषणांच चॉकलेट जसं चंद्रकांत पाटील यांनी आज मला दिलं तशी योजनांची चॉकलेट देऊ नका अशी बोचरी टीका करत त्याचबरोबर या योजनांच्या अंमलबजावणी कृपया सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका अशी टोला लगावत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट ही योगायोगाने आणि सहज झाल्याचा खुलासा ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुण्यातील ड्रग्ज पार्टीबाबत विचारले असता म्हणाले की, हे सगळे ड्रग्ज फक्त गुजरातमधील मुंद्रा या पोर्टवरून येत आहेत. या बंदरावर कधी तरी ड्रग्जची एखादी रेड मारली जाते आणि काही ड्रग्ज ताब्यात घेतल्याचे दाखविले जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज महाराष्ट्रात येतेच कसे असा सवाल उपस्थित करत राज्यातील तरूण पिढीला हे नासविण्याचे उद्योग थांबवायलाच पाहिजे असे सांगत उमेश पाटीलचे प्रकरण ताजे असताना इतका मोठा ड्रग्ज साठा येतो कसा असा सवालही यावेळी केला.

यावेळी अन्य एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींने विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार देणार का असा सवाल उपस्थित केला. त्यास उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीकडील एकूण संख्याबळ पाहता शिवसेना उबाठाचा एक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषद निवडणूक जिंकून येऊ शकतो. तसेच आणखी एक चवथा उमेदवारही निवडून येऊ शकतो. मात्र या मागील रणनीती मी इथेच सांगत बसलो तर मग निवडणूक कसे लढवू असा मिश्किल सवाल करत आता महायुतीने त्यांच्याकडील मते कसे राखता येईल ते पहावे असा चिमटाही यावेळी काढला.

 

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का मंत्री अनिल पाटील यांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार सह विरोधकांचा आक्षेप

राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *