Breaking News

उद्धव ठाकरे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची एसआयटी मार्फत चौकशी करा एकनाथ शिंदे यांच्या दोन महिन्यातील फाशीच्या शिक्षेच्या वक्तव्यावरून केली मागणी

बदलापूरातील दोन चिमुकल्यावर कथित अत्याचार केल्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यात शाळा प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनाने दिरंगाई केल्याची माहिती पुढे आली. तसेच शाळेच्या विश्वस्त पदांवर सर्व सत्ताधारी पक्षाशी संबधित असल्याची माहितीही पुढे आली. त्या विरोधात बदलापूरातील रहिवाशांकडून स्वयंपूर्तीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना आंदोलन राजकिय हेतून प्रेरित होत आणि त्यात बाहेरून आलेले लोक सहभागी होते असा आरोप केला. तसेच अशाच एका प्रकरणात दोन महिन्यापूर्वी एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे प्रत्युत्तर देत विरोधकांवर कढी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नाव जाहिर करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. तर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बॅकफूटला जाण्याची पाळी आल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वी ज्या आरोपीला फाशी दिल्याचे सांगत आहेत, त्याबद्दल माहिती बाहेर काढण्यासाठी एक वेगळी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी करत जर जलदगती न्यायालय स्थापन करून जर आरोपीला फाशी दिली असेल तर राज्यातील जनतेला त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे, तसेच ती माहिती जनतेसमोर आली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे. त्यांना फक्त जनतेच्या भावनांशी खेळता येते. ही व्यक्ती गद्दार आहे. जनतेच्या भावनांशी गद्दारी केली असून हे दुर्दैवी आहे, अशी टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बदलापूर येथे आंदोलन करणारे जर राजकिय असतील तर त्यात गैर काय असा सवाल उपस्थित करत जर हे लोक रस्त्यावर उतरले नसते तर गुन्हा ही दाखल नसता सुषमा अंधारे यांनी वामन म्हात्रेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. हे आंदोलन केले नसते तर तो सुटलाच नसता असे सांगत आंदोलक जर राजकिय वाटत असतील तर सत्ताधारी तितकेच विकृत आहेत अशी टीकाही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, कोलकाता येथील घटनेनंतर सातत्याने अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहेत. अशा घटना जेव्हा लागोपाठ घडतात तेव्हा जनप्रक्षोभाचा उद्रेक घडतो. या जनक्षोभात कोणत्याही राजकिय पक्षाचा सहभागाचा हात नसतो. महाराष्ट्रात अशा विकृतांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी २४ ऑगस्टचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी केले.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *