राज्यात मराठावाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर व उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर असून नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची तरतूदच नसल्याचे जाहिर केले.
त्याच वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना तेव्हाचे तात्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करत तसे पत्रही मला पाठवले होते. पण आज तेच विरोधी पक्षनेते सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत. आता तेच म्हणत आहेत की ओला दुष्काळाची कोणतीही तरतूद नाही असे सांगत आहेत, त्यांचे ते पत्र आजही माझ्याकडे आहे. मग मी ही त्या पत्रावर माझे नाव लिहून तेच पत्र त्यांना परत पाठवू का असा सवाल केला.
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई https://t.co/CGlyVXXVs0
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 1, 2025
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, परंतु मी त्यावेळी ओला दुष्काळ जरी जाहिर केला नसला तरी त्यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली. परंतु आताचे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना मदतही जाहिर करत नाही की त्यांची कर्जमाफीही जाहिर करत नसल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री जाहिरातीत व्यवस्त आहेत. तर एक उपमुख्यमंत्री ही जाहिरातीत व्यस्त असून त्यांच्या पक्षाच्या कामात जास्तच व्यस्त आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री तर काहीच अंगाला लावून घेत नाहीत. ते फक्त त्यांचेच काम करत असल्याची टीका करत पुढे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही साखर सम्राट सत्ताधारी भाजपात गेले. भाजपात गेल्यानंतर त्यांच्या साखर सम्राटानी कोट्यावधी रूपयांची कर्ज घेतली आणि त्यास थकहमी राज्य सरकारने दिली. फक्त कर्जासाठी साखर सम्राट सत्ताधाऱ्यांसोबत गेले. परंतु पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिली नाही की शेतकऱ्यांच्या कर्जाला थकहमी सरकारने दिली नसल्याची टीका केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे पद बदलीली की त्यांच्या भूमिकेत इतका बदल होतो का असा सवाल केला. त्यावेळी मुख्यमंत्री मी होता. तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांना मदत जाहिर करा, कर्जमाफी करा अशी मागणी करण्याचे पत्र त्यावेळी मला दिले होते. त्यावेळी ओला दुष्काळ ऐवजीमी आपत्तीग्रस्त अशा शब्द प्रयोग करत शेतकऱ्यांना मदतही केली आणि कर्जमाफीही केली. तसेच पुढे म्हणाले की, तिकडे पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे गेले होते. पण मदत देणार असल्याचे सांगितल्याचे मी बातम्यामधून पाह्यले. मात्र मुख्यमंत्री प्रस्ताव तयार करण्याचा त्यांच्या दोन फुल एक हाफ अशा उपमुख्यमंत्र्यासोबत अभ्यास सुरु आहे. त्यामुळे अद्याप प्रस्ताव मोदी यांच्याकडे गेला नाही असेही यावेळी सांगितले.
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | मातोश्री, मुंबई https://t.co/X2BBORTCVf
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 1, 2025
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीनंतर केंद्राचे पथक अशा भागांची पाहणी करण्यासाठी नेहमी येते. पण केंद्राचे पथक अद्याप महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले नाही. ते कधी येणार याबाबत सरकारकडून कोणतीच माहिती नाही.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पूरग्रस्त परिस्थिती भागाला भेट दिल्यानंतर मी म्हणालो होतो की, ग्रामीण भागात ज्या घरांत पाणी शिरले आहे त्यांच्यासाठी नवी घरे बांधा. पण या सरकारने आदेश तर जारी केले पण ४८ तास घरात पाणी राहिले असेल तर त्यांना नवी घरे बांधून देणार असल्याचा नवा नियम सरकारकडून पुढे करण्यात आला आहे. ही कसली अट अशी विचारणाही यावेळी केली.
त्यावर प्रसारमाध्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी गद्दारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाही. माझ्यासाठी ते आजही गद्दार आहेत. ज्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी जो पैसा खर्च केला तो पैसा त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्यांदा द्यावा असे सांगत एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.
तसेच भाजपा प्रवक्त्यांनी केलेल्या आरोपावर म्हणाले की, माझ्याकडून बिल घेऊन तुम्ही द्या आणि ते बिल मला परत मिळवून द्या अशी खोचक टीका केली.
तसेच शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडक्याला बहिणीला ६ महिने आधीच पैसे द्या, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आणि त्यांची कर्जमाफी जाहिर करावी अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya