Breaking News

उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही तुमचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा आहे. भाजपासोबत जो धोका घेतला तो मला नको आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा ठरवलं जायचं. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या पण यामध्ये असे नको आधी ठरवा आणि मग पुढे जा कारण त्यामध्ये धोका जास्त असल्याचा भीतीही यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करताना म्हणाले की, सेक्युलर सिव्हील कोड म्हणजे मोदींनी हिंदूत्व सोडलं का? असा खोचक सवालही केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक महाराष्ट्र धर्म रक्षणाची, स्वाभिमान रक्षणाची लढाई आहे. ही अशी लढाईची की एक तर तू राहशील नाहीतर मी राहील ! होऊन जाऊ दे जे व्हायचे ते होऊन जाऊ दे असे आव्हानही यावेळी भाजपाला देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारी योजना पोहचवणाऱ्याला १० हजार महिना दिला जातोय त्यासाठी दूत नेमले. हा लोकांचा पैसा आहे, अशा योजनामध्ये राज्याची लूट हे करत आहेत. आपण नाही होऊ शकणार दूत आपण अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहचवा, असे आवाहनही कार्यकर्त्यांना यावेळी केलं.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? यांचं खरं रूप काय?… गद्दार.. सरकार पडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला १५०० रुपये देत आहेत, सर्वोच्च न्यायालयात पक्षाची लढाई सुरू आहे. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी आपल्याला न्याय देवतेचा आशीर्वाद मिळेल. आपला निकाल ५० वर्षात नक्कीच लागेल असा उपरोधिक टोला लगावत भूतकाळात जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा राम शास्त्री प्रभुणे आठवतात. चंद्रचूड साहेब तुम्ही जे काय केलं आहे, त्याची सुद्धा नोंद भूतकाळात होईल, अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

सध्याच्या आरक्षणाच्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही राज्यात ओबीसी मराठा वाद लावलाय.. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. समाजा समाजात आगी लावू नका, असे आवाहन करत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्याचे नाटक केलं, त्यामुळे शिवसेनेचे खासदार मी दिल्लीत असल्यामुळे आपल्या सोबत होते. ते तर त्यावर बोललेच असते. परंतू कोणत्याही धर्माच्या जमिनीवर तुमचे मित्र बांधकाम करणार असतील तर ते कदापी होऊ देणार नाही असा इशाही यावेळी भाजपा आणि अदानी यांचे नाव घेता दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, महाराष्ट्रमध्ये ३१ जागी जनतेने भाजपाला नाकारले. त्यामुळे ते घाबरलेले आहेत, आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये सही करण्यावरून काहीतरी झालं असं म्हणत आहेत. आतापर्यंत आम्ही बघून सह्या केल्या का? म्हणजे आतापर्यंत न बघता सह्या केल्या आहेत.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, चारसौ पारचा नारा देणारे २४० वर थांबले आणि नंतर पलटी मारणारे दोन टेकू सोबत घेतले. सिव्हिल कोडमध्ये सेक्युलर शब्द तुम्हाला वापरावा लागला यात तुमची हार आहे. तुम्ही एक दिलाने जर महाविकास आघाडीमध्ये काम केलं तर आपलंच सरकार राज्यात येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे. यावेळी रस्ते सिमेंटीकरण करण्याची जबाबदारी MSIDC मंडळावर ही जबाबदारी दिली. स्टाफ त्यांच्याकडे नाही आणि ३७००० कोटींचा काम हे मंडळ करणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चावरही यावेळी टीका केली.

खासदार सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या की, बहिणीचा नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही… प्रेमात आणि व्यवसाया मध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचा नातं हे १५०० रुपयात विकत घेता येत नाही यांचं नातं फक्त मताशी जोडलेला आहे, एकातरी लाडक्या बहिणीचे पैसे परत घेऊन बघा गलिच्छ राजकारणात नातं येईल असा कधी वाटलं नव्हतं, अशी खोचक टीका अजित पवार यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहाण्यांनी कोर्टाची पायरी कधीच चढू नका… ही लढाई मशाल किंवा तुतारीची नाही तर तत्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तर अधिकारी आहेत. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना दुखविण्याच काम या लोकांनी केले. उद्धवजी बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते, सर्वोच्च न्यायलायची लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही. आपण प्रयत्नांची पराकष्टा करू पण सरकार आपलं आणू असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

Check Also

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *