उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत नाही. तोच आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामना होत आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, तीन-चार महिन्यातच ऑपरेशन सिंदूरमधील जवानांच्या पराक्रमाचा विसर भाजपाला पडललेला असून एकाबाजूला रक्त आणि पाणी एकाचवेळी वाहू शकत नाही म्हणून इशारा द्यायचा आणि दुसऱ्याबाजूला क्रिकेटचा सामना खेळायचा हे कोणते ऑपरेशन म्हणायचे असा सवाल केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरु होते, त्यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मेरे रगो मे सिंदूर दौड रहा है असे सांगितले होते. त्यावेळी भाजपाने घरोघरी घरोघरी सिंदूर वाटले होते. तसेच देशप्रेमाचे डोस पाजण्याचे अभियान राबविले होते. परंतु घरोघरी सिंदूरच्या अभियानावरून टीका सुरु झाल्यानंतर ते अभियान बंद केले असल्याची टीका केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पहलगाम येथील हल्ल्यात अनेकजणींचे सिंदूर पुसले गेले. त्यावरून पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशनची घोषणा केली. तर भारतीय लष्करातील भगिनी कर्नल सोफिया कुरेशी हिला याच भाजपाच्या पदाधिकाऱ्याने पाकिस्तानच्या दहशतवाद्याची भगिनी म्हणून नावं ठेवली होती. पण त्यावर भाजपावाले आणि पंतप्रधान मोदी हे काही बोलले नाहीत. ते ज्याला देशप्रेम म्हणतील त्यालाच बाकिच्यांनी होकार द्यायचा आणि तेज योग्य म्हणायचे. आणि इतरांनी मात्र काही बोलले की त्याला देशद्रोही ठरवायचं हे असेच सुरु ठेवले असल्याचा आरोपपही यावेळी केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत असलेला असाच एक क्रिकटचा सामना त्यांनी तिकडे गुजरातमध्ये नेला. कारण क्रिकेट सामन्यातून त्यांना फक्त मिळणारा पैसा हवा आहे. बाकी देशप्रेम वगैरे काही नको आहे असे सांगत देशप्रेम त्यांच्या पैशाच्या कमाई पुढे फिके आहे. त्यामुळेच त्यांनी भारत-पाकिस्तानचा सामना ठेवला आहे. यापूर्वी देशाच्या गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा यांचाच मुलगा जय शाह याच्या हातात क्रिकेट आहे. त्याने का नाही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घातला नाही असा सवाल करत पैशापुढे त्यांचे देशप्रेम तोकडे आहे. देशप्रेमाचा नुसता बाजार मांडला असल्याची टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यामुळेच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने माझं सिंदूर माझा देश हे राबविण्यात येणार असून उद्या सकाळी महिला आघाजीच्यावतीने देशभरातील प्रत्येक देशभक्ताने एका डब्यात क्रिकेट सामन्याच्या विरोधात सिंदूरच्या पुड्या जमा करून त्या पोस्टाने आम्ही पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यास बाळासाहेब ठाकरे यांनी घरी बोलविल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उभे करण्याची खरी औकात भाजपात आहे का असा खोचक सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला महत्व देत नाही कारण त्यांच्या पूर्वीच्या नेत्यांनी जीनाच्या कबरीवर डोकं ठेवले होते, त्यांच्याकडून आम्हाला देशप्रमाचे धडे आम्हाला घ्यायचे नाहीत असा टोलाही भाजपाला लगावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *