मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करून परतल्यानंतर भाजपाने जाहिर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आणखी मदत जाहिर करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशाच्या सैन्यासाठी सौर तंबू तंत्रज्ञान विकसित केले त्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरविले जात आहे. तर ज्या पाकिस्तानने आपल्या देशात अतिरेकी घुसविले त्या पाकिस्तानविरूद्ध क्रिकेट सामने खेळवले ते देशभक्त अशी उपरोधिक टीका केंद्र सरकारवर केली.
मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी “देशभक्तांना” रविवारी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणाऱ्या आशिया कप क्रिकेट अंतिम सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत ज्या काही प्रायोजक कंपन्या असतील, जाहिराती देणाऱ्या कंपन्या असतील त्यांना कंपन्यांनीही या सामन्याला जाहिराती देऊ नये असे आवाहनही यावेळी केले.
लडाख या केंद्रशासित प्रदेशात राज्यत्व आणि संवैधानिक संरक्षणासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये चार जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाल्यानंतर दोन दिवसांनी हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कडक राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) तंर्गत गुन्हे दाखल करण्यात आली.
सोनम वांगचूक यांच्या अटकेबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हे दुर्दैवी आहे. सोनम वांगचुक यांनी कठीण प्रदेशात भारतीय सैन्यासाठी सौर तंबू तंत्रज्ञान विकसित केले. आमच्या सैन्यासाठी काम करणाऱ्याला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आले आहे आणि एनएसए NSA अंतर्गत अटक करण्यात आली आणि तुम्ही भारतात दहशत पसरवणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहात. ही कोणत्या प्रकारची देशभक्ती आहे?” असा सवालही यावेळी केला.
लेह अॅपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) चे प्रमुख आवाज असलेले सोनम वांगचुक हे गेल्या पाच वर्षांपासून लेह आणि कारगिलमधील रहिवाशांना राज्याचा दर्जा आणि संवैधानिक संरक्षण मिळावे यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. हे दोन्ही भाग ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्यातून वेगळे होऊन केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग आहेत.
विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे, कारण दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाविरुद्ध क्रीडा उपक्रमात सहभागी होणे चुकीचे आहे.
१४ सप्टेंबर रोजी, भारताने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेशातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांमधील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले.
Marathi e-Batmya