आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार यांद्या आणि बोगस मतदारांवरून निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. यामध्ये निवडणूक आयुक्तांवरही गुन्हा दाखल होऊन त्यांना सजा झाली पाहिजे, असं म्हणत आमचं सरकार आल्यानंतर आम्ही निवडणूक आयुक्तांवर खटला भरणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.
भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष कसला भारतीय जनता पक्ष म्हणजे देशभक्तांची बोगस टोळी आहे. स्वतःला देशप्रेमी म्हणून जाहिर करायचं आणि बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे असं सांगतता, अजून आत्मनिर्भर भाजपा होत नाही असा टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक चोरावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, पक्ष फोडावे लागतात, मते चोरावी लागतात आणि म्हणे की आत्मनिर्भर हे कसले आत्मनिर्भर अशी टीकाही यावेळी केली.
UddhavSaheb Thackeray #LIVE | निर्धार मेळावा | संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा! | एन. एस. सी. आय. डोम, वरळी, मुंबई https://t.co/6lyvaqITg6
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 27, 2025
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आरे खुल्या मैदानात या ना, तुम्ही मर्दाची औलाद असाल तर अणं ना मर्दाची औलाद असाल तर मतचोरी करून या. आता भाजपाने काय करायचं ते ठरवावं असा सवाल करत आम्ही मर्दाची औलाद आहोत, आम्ही लढणारे आहोत असं म्हणतं महायुतीला आव्हान दिले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ईव्हीएममध्ये गडबड होते. याबाबत असणारा संशय अजूनही आहे. तो संशय गेलेला नाही. यातच आता निवडणूक आयोगाने जाहिर केलं की महापालिकेच्या निवडणूकीत व्ही व्ही पॅट पण ठेवणार नाही. मग निवडणूक कशाची घेणार बोगस मतदार मतदान करून जाणार, तुम्हाला वाटेल तसे निर्णय देणार आम्ही केलं तर आमच्यावर कायद्याचा बडगा उगारणार असा सवाल करत मग माझं म्हणणं आहे की, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही केस केली पाहिजे निवडणूक आयुक्तांनाही सजा झाली पाहिजे असे सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. आम्ही गुन्हा केला तर कायद्याच्या कचाट्यात सापडत असू तर मग निवडणूक आयुक्तांना देखील सजा झालीच पाहिजे. पुढच्या लोकसभेला अद्याप वेळ आहे. आता त्यांचे दिवस असतील पण चोरून घेतलेले, पण उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. एकदा आमचं सरकार आलं तर निवडणूक आयुक्तांकर खटला दाखल करून न्यायलयासमोर उभा करू असा इशारा दिला.
Marathi e-Batmya