Breaking News

नागा मंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भुमिपुजन नागालॅण्डमध्ये १० एकरवरावर शेती होणार

नागालँन्डच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरणा-या नागा मंडई या १० एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भुमिपुजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्हयातील सेथेकेमा-ए येथे संपन्न झालेल्या या भुमिपुजन सोहळयास नागालँन्डचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज भुमिपूजन करण्यात आले.

नागा मंडई हा कृषी विभागाच्या सहकार्याने ग्रामीण अॅग्रो फार्म्स लिमीटेड या कंपनीचा उपक्रम आहे. या कंपनीतर्फे नागालॅन्डमध्ये १ हजार एकरवर शेती करण्यात येत असून या शेतीतील उत्पन्न शेतमाल नागामंडई मध्ये विक्रीस आणला जाणार आहे. या नागामंडईमुळे नागालॅन्डमधील शेतकरी संपन्न, समृध्द होणार असुन नागालॅन्डमधील कृषी आणि व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. पर्यायाने नागालॅन्डचा चांगला विकास होईल. असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

नागा मंडईच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्पर्धात्मक किमतीत उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक वाजवी आणि पारदर्शक बाजारपेठ, सुधारित बाजारपेठेतील प्रवेश, कार्यक्षम खरेदी, साठवण आणि वितरणाद्वारे कापणीनंतरचे नुकसान कमी करणे आणि नागालँडमधील आर्थिक विकासाला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश होतो.

मंडीमध्ये व्यापाऱ्यांसाठी ११० किरकोळ दुकाने, एकूण ४,००० मेट्रिक टन क्षमतेची १० गोदामे, पारदर्शक व्यापारासाठी २ लिलाव यार्ड, प्रत्येकी ५०० मेट्रिक टन क्षमतेचे २ कोल्ड स्टोरेज युनिट आणि दोन्ही वातानुकूलित किसान भवन असतील. अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिली.

यावेळी नागालॅन्डचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष मुगाथोआए , रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, रिपब्लिकन पक्षाचे आमदार लिमाअनयन चाँग, आमदार मथंग यानथन, आमदार ए.आर. ज्वेगा, घनश्याम चिरणकर, सलीम, जी.के. रमा कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत साहु, सांगर संगवई आणि चेतना गांगर यांनी केले होते.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *