उत्तर भारतीयांनाही महाराष्ट्रात ओबीसींचा दर्जा द्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी

यूपी, बिहार, मध्य प्रदेश येथे या समजाला ओबीसी मानले जाते. मात्र महाराष्ट्रात त्यांची आडनावे ही ओबीसीमध्ये येत नाही म्हणून त्यांचा समावेश ओबीसी मध्ये होत नाही. त्यामुळे  यूपी, बिहारमधील मुंबईत राहणाऱ्या या समजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणी केल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.

सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरुपम हटावची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांनी उत्तर भारतीय ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेत मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे निरूपम हटावच्या मोहिमेला मागे पाडण्यासाठी निरूपम यांनी ही खेळी खेळल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान सध्या मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळलेल्या मुंबईतील नेत्यांनी निरुपम यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यातच संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कशासाठी घेतली अशी चर्चा आता काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रंगू लागली आहे. मात्र याबद्दल संजय निरुपम यांना विचारले असता त्यांनी अधिकचे बोलणे टाळत ही भेट फक्त मुंबईमधील यूपी आणि बिहारच्या ओबीसी समाजाचे लोक आहेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये देखील ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा’ ‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी? महाग वीजदरामुळेच राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात गेले; महाग कोळसा घेतल्यास वीजही महागच मिळणार

भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *