ईव्हीएम EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जनआंदोलन राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात!

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २००४ पासून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएम EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *