वर्षा गायकवाड यांचा खोचक सल्ला, लाडकी बहिण योजनेसाठी मोदी सरकारकडून पॅकेज आणा आदिवासी, मागास व वंचित समाजाच्या हक्काचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवू नका

भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजासाठी असलेला निधी वळवला आहे. नियमानुसार या समाज घटकांचा निधी इतर खात्याला वर्ग करत येत नाही, पण भाजपा सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहे. आदिवासी व सामाजिक विभागाचा निधी कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहिण वा इतर योजनांसाठी वळवू करु नका अशी मागणी करत जर सरकारकडे पैसे नसतील तर केंद्रातील मोदी सरकारकडून विशेष पॅकेज आणा अशी उपरोधिक सल्लाही यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा ७४६ कोटी रुपयांचे निधी वळवला आहे. या विभागाचा निधी हा दलित, मागास व आदिवासी विभागाच्या कल्याणासाठी आहे तो दुसऱ्या योजनेसाठी वर्ग करून मागास समाजावर भाजपा युती सरकार अन्याय करत आहे, हा अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारकडे पैसे नव्हते तर जनतेला आश्वासन दिलीच कशाला असा सवाल करत महाराष्ट्राला कर्जबाजारी करून फक्त लाडके उद्योगपती, लाडके कंत्राटदार यांची घरे भरली जात आहेत असा आरोपही यावेळी केला.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकार राज्याला मोठी मदत करतात अशा गप्पा मारणारे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे. परंतु मागास वर्गांसाठीचा निधी वापरू नये असा उपरोधिक टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुसूचित जाती-जमातींच्या उप-योजनांसाठीचा राखीव निधी दुसरीकडे वळवणे तत्काळ थांबवावे अशी मागणी केली होती. हा राखीव असलेला निधी ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी वापरण्यात येत आहे, हे केवळ अन्यायकारकच नाही तर घटनात्मक तरतुदींनाही हरताळ फासणारे आहे. हा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी आणि या उप-योजनांना कायदेशीर दर्जा द्यावा, जेणेकरून हा निधी फक्त दलित आणि आदिवासी समुदायाच्या उपयोगासाठीच राखून ठेवला जाईल. हा विषय केवळ बजेटचा नाही तर सामाजिक न्यायाचा आणि वंचित समाजाच्या हक्काचा आहे असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *