वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना तिकीट तर बारामतीत पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात लोकसभा निवडणूकीसाठी आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान राज्यात भाजपाच्या ४५+ च्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला भेटून उमेदवारीही मागितली. परंतु मनसेचे माजी मनसैनिक वसंत मोरे यांनी मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर आज अखेर वंचित बहुजन आघाडीने आज जाहिर केलेल्या ५ उमेदवारांच्या यादीत वसंत मोरे यांना पुणे येथून उमेदवारी जाहिर केली.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून बारामती येथील नणंद भाऊजयच्या लढतीत अर्थात सुनेत्रा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात वजन टाकत पाठिंबा जाहिर केला.

त्याचबरोबर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अफसर खान यांना उमेदवारी जाहिर केली आहे. शिरूर येथून मंगलदास बागूल यांना, परभणीतून बाबासाहेब उगले, नांदेड येथून अविनाश बोसिकर तर पुणे येथून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे.

About Editor

Check Also

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *