विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या दोघांना उमेदवारी आणखी दोन जागांवरील उमेदवार नंतर जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत.नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *