Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सुवर्णपदक विजेती राही सरनोबत शासकीय सेवेत असली तरी कामावर रुजू झाल्यापासून तिला वेतन मिळत नाही. तर दुसरीकडे शहीद मेजर अनुज सुद यांच्या कुटुंबियांना मदतीपासून डावलले जात आहे. जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा इथे दहशतवाद्यांशी लढताना २ जुलै २०२० रोजी सूद शहीद झाले. त्यावेळेस त्यांचे वय ३० वर्ष होते. २००५ मध्ये कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्यास होते. शहीद सैनिकांच्या कुटुंबांना राज्यसरकारकडून मिळणारे भत्ते आणि लाभ सुद यांच्या पत्नीला नाकारण्यात आले आहेत. सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या राहीला वेतन मिळत नाही आणि विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला अकरा कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून सवलत मिळते असा खोचक सवालही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शहीद सुद यांच्या बाबतीत सरकारच्या धोरणाबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयाने विशेष बाब म्हणून या प्रकरणाकडे सरकारने बघावे अशी नोंद केली तरीही शिंदे सरकारने धोरणात्मक निर्णयाचे कारण देत टाळाटाळ केली. कोर्टाच्या निर्देशानंतरही शहीद सूदच्या कुटुंबाला वणवण भटकावे लागत आहे. तिजोरी खाली असताना अकरा कोटी रुपये खिरापत वाटली तसे यांना फार लागणार नाही. त्यामुळे नेमबाज राही सरनोबतला वेतन देण्यात यावे व शहीद सूदच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणीही यावेळी केली.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *