विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश मुस्लिम खाटीक समाज, उच्च न्यायालयातील वकील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत पक्षात प्रवेश देण्याची मागणी केली होती. मात्र आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या डॉ ज्योती विनायक मेटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते.

ज्योती मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते- पाटील,  खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, व आमदार शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष व धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक युसूफ खाटीक यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, अकील भाई, हाजी मोहसीन शेख मुनाफ व इम्रान भाई हे उपस्थित होते.

संभाजीनगर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एन. पी. पाटील जमालपुरकर, भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. विनायक बाजपाई व डी. वाय. पाटील विधी विद्यापीठाच्या संचालिका सौ. करूणा मालवीय यांच्यासह ओबीसी नेते प्रा. डॉ. धनंजय बेडदे, ॲड. निखिल बाजपाई, प्रा. चव्हाण, प्रा. हर्षल पडवळ यांनीही सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; यावेळी आमदार रोहित पवार व पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे हे उपस्थित होते.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *