नगरपरिषद व नगरपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्टला मतदान राज्य निवडणूक आयोगाची माहिती

विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण ११ सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभूळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. २५ जुलै २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. १२ ऑगस्ट २०२४ रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *