मुंबईच्या निवडणूक निकालात मुंबईचे राजकारण नेमके काय दिसले माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगलीच्या नजरेतून निवडणूकीचा निकाल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२५–२६ या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत मुंबईच्या राजकारणाचे स्पष्ट चित्र आकडेवारीतून समोर आले आहे. एकूण २२७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद आजमावली.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाचा मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी तब्बल ४५.२२ टक्के मते भाजपाकडे गेली आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राहिली. या गटाने ६५ जागांवर विजय मिळवून ७,१७,७३६ मते मिळवली. एकूण मतदानात त्यांचा वाटा १३.१३ टक्के असून, विजयी मतांपैकी २७.५२ टक्के मते या पक्षाला मिळाली.

तर पारंपरिक शिवसेना पक्षाने २९ जागा जिंकत २,७३,३२६ मते मिळवली. त्यांचा एकूण मतदानातील वाटा ५ टक्के असून, विजयी मतांमध्ये १०.४८ टक्के हिस्सा आहे.

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने २४ जागांवर यश मिळवत २,४२,६४६ मते मिळवली. काँग्रेसचा एकूण मतदानातील वाटा ४.४४ टक्के असून, विजयी मतांमध्ये ९.३१ टक्के हिस्सा आहे.

याशिवाय ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) यास ८ जागा आणि ६८,०७२ मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यास ६ जागा आणि ७४,९४६ मते, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यास ३ जागा आणि २४,६९१ मते, समाजवादी पार्टी यास २ जागा आणि १५,१६२ मते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यास १ जागा आणि ११,७६० मते प्राप्त झाली आहे.

एकूण २२७ विजयी उमेदवारांना २६,०७,६१२ मते मिळाली असून, हे प्रमाण एकूण मतदानाच्या ४७.७२ टक्के इतके आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण मुंबईत एकूण मतदान ५४,६४,४१२ इतके झाले, तर ११,६७७ मते बाद (रद्द) ठरली.

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मुंबई पालिकेत बहुपक्षीय राजकारण कायम असले तरी भाजपाचा प्रभाव लक्षणीय वाढलेला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकत्रित ताकद अजूनही महत्त्वाची असून, काँग्रेस व इतर पक्षांची भूमिका संख्येने मर्यादित असली तरी राजकीय समतोल राखण्यात ती निर्णायक ठरू शकते.

मुंबईकरांनी दिलेला हा कौल पुढील काळात मनपातील सत्ता-समीकरणे, विकास धोरणे आणि प्रशासकीय दिशा ठरवणारा ठरणार आहे.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा नुकताच निकाल जाहिर झाला. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *