आमदार झिशान सिद्दीकी आणि अध्यक्ष भाई जगताप यांचा वाद पोहोचला सोनिया गांधींच्या कोर्टात राजगृहातील प्रवेशावरून झाली होती वादावादी

मुंबईः विशेष प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहातील प्रवेशावरून काँग्रेसचे बांद्र्यातील आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्यात झालेल्या वादावादी झाली. या वादावादीची तक्रार झिशान सिद्दीकी यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एक पत्राद्वारे केली.
काँग्रेसने काढलेल्या महागाई विरोधातील मोर्चाच्या वेळी मोर्चाची सुरुवात दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या राजगृह ते आंबेडकरांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीपर्यंत जाणार होती. या मोर्चाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते वेणूगोपाल हे ही उपस्थित होते. मात्र राजगृहात प्रवेश करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांनी झिशान सिध्दीकी यांना प्रवेश नाकारला. तसेच कोणीही आमदार-बिमदार असो त्याने आत यायचे नाही असा बजावले. विशेष म्हणजे झिशान शेख हे मुंबई काँग्रेसचे युथ अध्यक्ष आहेत. यासंदर्भात झिशान सिध्दीकी यांना भाई जगताप यांना मी ही आमदार असून युथ काँग्रेसचा अध्यक्ष असल्याचे सांगत आपणालाही प्रवेश द्यावा अशी विनंती केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
त्यावर भाई जगताप यांनी झिशान सिद्दीकी यांना असंसदीय भाषेत बोलत त्यांच्या जातीच्या अनुषंगानेही टीका टीपण्णी केली. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर माझा अपमान झाला. यासंदर्भात झिशान सिद्दीकी यांनी पुन्हा भाई जगताप यांना यासंदर्भात समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी समजून घेतले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर झिशान शेख यांना काँग्रेसने तयार केलेल्या ट्रकच्या रथातही चढण्यास मनाई केल्याचा आरोप त्यांनी पत्राच्या माध्यमातून केला.
काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांच्याकडून माझ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून आपणच भाई जगताप यांच्या वागण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही झिशान सिद्दीकी यांनी पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधी यांच्याकडे केली.
या पत्रानंतर सोनिया गांधी अशोक भाई यांच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे संपूर्ण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे डोळे लागले आहे.

आमदार झिशान सिद्दीकी यांनी पाठविलेले सोनिया गांधींना पाठविलेले हेच ते पत्रः-

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *