जगाच्या प्राचीन इतिहासात आणि दस्तुरखुद्द भारतातही या देशाची मूळ ओळख ही बुद्धाचा देश म्हणून अशीच आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरांत आणि अनेक प्राचीन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मंदिराच्या खाली बौध्द लेणी किंवा बौद्ध विहारांचे अवशेष मिळतात. इतकेच काय अनेक प्राचीन हिदू देवदेवतांच्या मंदिरावरील घुमट हे बौध्द विहारांची आठवण करून देतात. इतकेच काय महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या अंधेरी-जोगेश्वरी येथील गुंफांमध्ये आणि लोणावळ्याला जाताना कार्ला-भाज्या लेण्यांमध्ये बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष आढळून येतात. मात्र या बौद्ध लेण्यांमध्ये हिंदू धर्मातील देवींचे आणि देवांचे अस्तित्व जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे तेथे साधा फरफटका जरी मारला तरी लगेच लक्षात येते. तसेच आरकॉलॉजी ऑफ इंडियाने अनेक ठिकाणी लावलेल्या फलकांवर सदरची लेण्या किंवा प्राचीन शिलालेख हे बौद्ध धर्माचे असल्याचे संदर्भ आहेत.
मात्र मागील काही काळात देशातील बौद्ध संस्कृती लोप पावत गेली आणि हिंदूत्व घरोघरी आणि समाजात व राजकारणातही वाढीस लागले. त्यामुळे बौद्ध अस्तित्वाच्या पाऊलखुणा या आता हिंदूत्वाच्या पाऊल खुणा म्हणून ओळखल्या जात आहेत. याची आणखी दोन उदाहरण म्हणजे तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा पांडूरंग हे दोन्ही दैवत ही बौध्दच असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते. तसेच कोकणातील एका भागात तर बौद्ध लेणी अद्याप असून त्या बौध्द लेणीकडे ना भारतीय पुरातत्व खात्याचे लक्ष आहे ना राज्य सरकारचे. त्यामुळे ती लेणी अद्याप दुर्लक्षित राहिली आहे.
तिरूपतीचा बालाजीची मुर्ती ही तर तथागत गौतम बुद्धाची उभी असलेल्या अवस्थेतील मूर्ती असल्याची बोलली जात असून त्यासंदर्भात सोलापूरातील म्हेत्रे या प्राध्यापकानी त्यांच्या एका इंग्रजी भाषेतील पुस्तकात लिहिले आहे. तसेच त्याचे अनेक विध संदर्भही दिले आहे.
इतकेच काय सध्याच्या काळातील हिंदूत्ववादी जनतेचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही जपानला जेव्हाही जातात तेव्हा बुद्धाच्या देशातून आलो असल्याचा आवर्जून उल्लेख करतात.
त्यामुळे भारत भूमी ही खऱ्या अर्थाने बुद्धाची आणि बौध्दांचा देश म्हणूनच ओळखला जातो. तसेच भारताच्या बौद्ध धम्माचा इतिहास हा प्रामुख्याने चीन मधील अभ्यासकांनी आणि पर्यटकांनी त्यावेळच्या त्यांच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवला आहे.
पण आज बौद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने वैयक्तिक आयुष्याबरोबर राजकिय जीवनातही तथागत गौतम बुद्धांचे सर्मपक अस्तित्व किती महत्वाचे आहे याचा जणू चालता-बोलता इतिहास दस्तुर खुद्द पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी दाखवून दिला आहे.
साधारणतः बांग्लादेशाची निर्मिती झाल्यानंतर भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्णय तेेव्हाच्या पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी घेतला. त्यावेळी अमेरिकेची आयएएस आणि सीआयए या दोन गुप्तचर संघटना तेव्हाच्या बलाढ्य गुप्तचर संस्धा म्हणून ओळखल्या जात होत्या. परंतु इंदिरा गांधी सरकारने घेतलेला तो निर्णय कसातरी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला कळाला. त्यामुळे अमेरिकेकडून सातत्याने भारतावर पाळत ठेवली जात आहे.
विशेष म्हणजे त्या वेळी जगात अण्वस्त्रांची मक्तेदारी अमेरिका-रशिया यो दोन देशांकडेच होती. त्यामुळे या दोन्ही देशांकडून आपल्याशिवाय कोणाकडेच अण्वस्त्रे नसावीत या मताचे होते.
परंतु स्व. इंदिरा गांधी यांनी काहीही करून भारताला अण्वस्त्र धारी देशांच्या पक्तींत बसवायचे असा निर्णय घेतला आणि तसा चंगही बांधला. परंतु ही अण्वस्त्र चाचणी कोठे करायची आणि कधी करायची याची सगळी योजना त्यांनी आखली. पण ही चाचणी कशी करायची आणि दूर दिल्लीत बसलेल्या इंदिरा गांधी यांना कशी कळवायचे याची एक सांकेतिंक वाक्य निश्चित करण्यात आले.
त्यावेळी अमेरिकेची सॅटेलाईटही अवकाशातून भारतावर सातत्याने लक्ष ठेवून होती. पण स्व. इंदिरा गांधी आणि तेव्हाच्या आपल्या भारतील शास्त्रज्ञांनी अमेरिकेला गुंगारा देत निश्चित ठरलेल्या दिवशी पहिल्यांदा अण्वस्त्राची अर्थात अणु चाचणी घेतली आणि एका सक्षम आणि सामर्थ्यवान भारताचा जन्म झाला असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. अणु चाचणी झाल्यानंतर जंग जंग पछाडणाऱ्या अमेरिकेलाही त्यानंतरच भारताने अणु चाचणी घेतली हे कळाले.
त्यावेळी अणु चाचणी यशस्वीरित्या पार पाडली हे सांगण्यासाठी तेव्हाच्या शास्त्रज्ञांनी जे सांकेतिक वाक्य निवडले होते, ते होते “आणि बुद्ध हासला”. आणि हे वाक्य राजस्थानातील पोखरण येथून जेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी इंदिरा गांधी यांना कळविले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्याची लकेर उमटली आणि त्याही म्हणाल्या की, आणि बुद्ध हसला.
हा संपूर्ण इतिहास ८० च्या दशकातील बालभारतीच्या पाठ्य पुस्तकातून तेव्हाच्या विद्यार्थ्यांना शिकविला जात होता. या निमित्ताने बौद्ध विचारधारेचा राजकिय जीवनात आणि देशाच्या मानमरातब वाढविण्यासाठी होऊ शकतो हे स्व. इंदिरा गांधी यांनीच दाखवून दिले आणि त्या पद्धतीची विचार सरणी त्यांनी स्थापितही केली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये.
लेखक-गिरिराज सावंत
gsawnt2001@yahoo.co.in
Marathi e-Batmya